पोंभुर्णा तालुक्यातील भाजपाचा गड कोसळला

0
837

पोंभुर्णा तालुक्यातील भाजपाचा गड कोसळला

गोंडवाना,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ठरली लक्षवेधी

निकाल ग्रामपंचायतीचा बोलबाला मोगरकरांचा

पोंभुर्णा प्रतिनिधी :- पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच जाहिर झाला यात सत्ताधारी भाजपा ला धक्का बसला तर तालुक्यातील छोटे पक्ष असलेले गोंडवाना,शिवसेना, व राष्ट्रवादी काँग्रेस ने मोठि कामगीरी केली आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीचे निकालात भाजपा ९ , गोंडवाना ४ ,महाविकास आघाडीचा १२ तर अपक्षांनी २ ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला आहे.पोंभुर्णा तालुक्यातील विकास बघता भाजपाचा एकतर्फी विजय होईल असा कयास लावला जात होता परंतु मतदारांनी याउलट परिस्थिती निर्माण केली आहे.
भाजपाच्या दिग्गज उमेदवारांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.भाजपा हि विकासाच्या मुद्द्यावर हि निवडणुक लढविली होती.
मागील सत्रात असलेल्या सरपंचांना उमेदवारांनी नाकारल्याचे दिसुन येत आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पाडल्यानंतर आज तहशील कार्यालय पोंभुर्णा येथे मतमोजणी प्रकिया झाली यात तालुक्यातील गावागावात विविध पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
💥 कसरगट्टा :- गोंडवाना गणतंत्र पार्टी
💥चेक आष्टा :- गोंडवाना गणतंत्र पार्टी
💥केमारा :- गोंडवाना गणतंत्र पार्टी
💥सातारा तुकुम:- गोंडवाना गणतंत्र पार्टी
💥देवाडा बुज :- कांग्रेस प्रणीत पॅनल
💥थेरगाव :- कांग्रेस, शिवसेना प्रणीत पॅनल
💥 आष्टा :- कांग्रेस, शिवसेना प्रणीत पॅनल
💥आंबेधानोरा :- कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रणित पॅनल
💥देवाडा खुर्द :- मोगरकर पॅनल
💥घनोटि तुकुम :- त्रिशंकू कांग्रेस+शिवसेना आघाडी
💥नवेगाव मोरे :- कांग्रेस प्रणीत
पॅनल
💥वेळवा :- त्रिशंकू शिवशाही पॅनल
💥जुनगाव :- भाजपा
💥मोहाळा :- भाजपा
💥चिंतलधाबा :- भाजपा
💥घाटकुळ :- भाजपा
💥 पिंपरी देशपांडे :-भाजपा
💥चेक हत्तीबोळी :- भाजपा
💥फुटाना :- भाजपा
💥भिमणी :- भाजपा
💥दिघोरी :- शिवसेना , पॅनल
💥चेक फुटाना :- काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी
💥घोसरी :- कांग्रेस
💥उमरी पोतदार :- कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस
💥चेक ठाणा :- कांग्रेस प्रणीत पॅनल
💥चेक ठाणेवासणा :- राष्ट्रवादी काँग्रेस, कांग्रेस
💥फुटाना :-भाजपा
हे पॅनलने तालुक्यात विजय मिळवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here