एसडीआे राेहन घुगेंचा रेती तस्करांना दणका !
चंद्रपूर तालुक्यात अवैध रेतीची वाहतुक थंडावली !
🟣🔶💠चंद्रपूर 🌀☀️🟪🌀किरण घाटे🟧जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर🟣🛑☀️चंद्रपूर महसुल विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा स्थानिक उपविभागीय अधिकारी राेहन घुगे यांनी गुरुवारी पहाटेला घुग्गुस परिसरातील काही माहिर रेती तस्करांवर केलेल्या धडक कारवायांमुळे सध्याच्या परीस्थितीत या परिसरातील (अवैध रित्या) हाेणारी रेती वाहतुक कमी झाली असल्याचे चित्र दिसून येते .एरव्ही दिवसरात्र बिनदिक्कत पणे या भागात रेतीची वाहतुक माेठ्या प्रमाणात सुरु हाेती .जनतेच्या या बाबतीत वारंवार तक्रारी येत हाेत्या . 🌼🟨🟢🌀🟡🟪🌀🟣🔶चंद्रपूर जिल्ह्यात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन आेळखल्या जाणां-या एसडीआे राेहन घुगे यांनी लगेच गुप्त माहितीच्या आधारे (अवैध रेती) २४ वाहनांना घाटावर पकडुन त्यांचे वर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली .🟪🟡🌀🟣🟢स्वताच्या प्राणाची पर्वा न करता या आधी सुध्दा मध्यरात्री १८०ब्रास रेतीचा साठा घुगे यांनी याच तालुक्यात पकडला हाेता .हे विशेष ! 🟣☀️🟧🟪🟢🟡🔶🟣🌀घुग्गुस परिसरातील या धडाकेबाज कारवायांमुळे रेती माफियांचे अक्षरशा धाबे दणाणले आहे एकीकडे महसुल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तर दुसरी कडे खनिकर्म शाखेचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे फिरते पथक जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीवर अंकुश लावण्यांचा दिवस रात्र सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे एकंदरीत दिसुन येते.🟨🌼💠🟨🌼दरम्यान एसडीआे राेहन घुगे यांनी रेती तस्करांवर केलेल्या या धडक कारवाय़ांचे जिल्ह्यातील जनतेनी स्वागत केले आहे .