कोरोनाच्या संकट काळात व्यावसायिक व सामाजिक जीवन सुलभ करा

0
413

 

चंद्रपूर मेडिकोज असोसिएशन द्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली मागणी

संपूर्ण जगभरात कोरोना या आजाराने थैमान घातलेले आहे तीच परिस्थिती देशात सुद्धा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत परंतु या परिस्थितीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली आहे ती अशी की 95% कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांना साधी सर्दी-खोकला-ताप सुद्धा नाही. बाहेर गावावरून आले म्हणून त्यांची तपासणी केली व ती पॉझिटिव्ह आली वैद्यकीय भाषेत त्यांना आजार नसलेले कॅरियर म्हटले जाते ते रुग्ण सुद्धा नसतात केवळ पाझीटीव्ह असल्यामुळे आपण त्यांना संस्थागत विलगीकरण मध्ये ठेवून किंवा त्यांना दवाखान्यामध्ये भरती करीत आहोत हे नक्कीच स्वागतार्ह आहे. पण केवळ त्या संख्येचा आधार घेऊन आणि जिल्ह्याला वारंवार लाकडावून करणे यामुळे जनतेचे जीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.लाकडावूनच्या सध्याच्या धोरणामुळे विविध छोट्या मध्यम, दुकानदार, व्यापारी, व्यवसायिक यांच्यावर आर्थिक डबघाईस ची पाळी आली आहे. या परिस्थितीमध्ये मोठ्या संख्येत जनता आर्थिक व मानसिक तणावाने ग्रस्त आहे यामुळे जिल्ह्यात आत्महत्या सुद्धा झालेल्या आहेत. ही बाब आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय गंभीर आहे म्हणून या बाबतीत शासनाने पुनर्विचार करावा अशी मागणी जिल्हा मेडिकल असोसिएशन द्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
लॉकडाऊन च्या काळात जनतेला कामकाजाची निर्धारित वेळ कमी असल्यामुळे लोकांची गर्दी वाढते व कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे सामाजिक संसर्ग किंवा कम्युनिटी स्प्रेड होण्याची शक्यता सुद्धा वाढते. हे आपल्या उद्देशाच्या विपरीत आहे. आम्हाला डॉक्टर म्हणून व एक जबाबदार सामाजिक घटक म्हणून जनतेची काळजी आहे. कोरोना प्रतिबंधासाठी जे काही सकारात्मक उपाय केले पाहिजे त्यांच्या आम्ही समर्थनार्थ आहोत पण जर उपायांमुळे जनतेला जास्तीत जास्त त्रास होत असेल तर “आजारापेक्षा औषध भयंकर” असे म्हणणे वावगे ठरणार नाही. म्हणूनच शासनाने या लाकडावून धोरणाचा पुनर्विचार करावा अशी आमची मागणी आहे.ज्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये रुग्ण संख्या भरपूर वाढलेली असताना सुद्धा तेथील प्रशासनाने ज्या पद्धतीने लाकडावून चे धोरण हाताळले आणि त्यामुळे तिथली रुग्ण संख्या सुद्धा कमी झाली आणि तिथले व्यवहार सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे सुरू आहेत. त्यामुळे लोकांचे दैनंदिन व्यवहार सर्व उद्योजकांच्या आणि व्यवसायिक यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत सकारात्मक परिणाम झालेला आहे. आपल्या जिल्ह्यात सुद्धा याच पद्धतीने मालेगाव मॉडेल राबवता येते हे याचासुद्धा आपल्या स्तरावर विचार करावा. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना साथीच्या काळात जनतेचे व्यवसायिक जीवन व सामाजिक जीवन सुरळीत पणे हाताळता येईल यासाठी प्रयत्न करावा डॉ अभिलाषा गावतुरे डॉ सचिन भेदे राजु झोडे करिता जिल्हाअधिकारी यान्या निवेदन देत आहोत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here