नायलॉन मांज्या विक्रेत्यांवर तथा नायलॉन मांज्याची पतंग उडविणा-यांवर त्वरित कारवाई करा !

0
740

नायलॉन मांज्या विक्रेत्यांवर तथा नायलॉन मांज्याची पतंग उडविणा-यांवर त्वरित कारवाई करा !

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने दिले अधिका-यांना निवेदन !

🟪💠चंंद्रपुर🟨🌀🛑🟪किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर💠☀️

मकर संक्रांती निमित्त संपूर्ण देशभरात अत्यंत आनंद व उत्साहात पतंग उडवून हा सण साजरा केला जातो. लहान -मोठी अशी वयाची बंधन नसलेली ही पतंग उड़विण्याची कला अनेकजण जोपासतांना दिसतात.परंतु यामुळे पर्यावरणा सोबतच अनेकांचे जीव धोक्यात आल्याने यावर तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या माध्यमांतून करण्यात आली आहे.
☀️🟪🌀🟩बदलत्या परिस्थितीनुसार आता अनेक प्रकारच्या प्लास्टिकच्या पतंग व नायलॉन मांज्याचे धागे बाजारात विक्रीस येऊ लागले. या नायलॉन मांज्यामुळे पशु-पक्षी ,प्राणी व मानवांचाही जीव धोक्यात आला आहे. अनेकदा नायलॉन मांज्या अडकून प्राणही गमवावे लागले आहे. पशुपक्ष्यांच्या पायांत हे धागे अडकून त्यांनाही आपला जीव गमवावा लागत आहे. 🛑☀️🟪🌀त्यामुळे नायलॉन मांज्याची विक्री करणारे तसेच या मांज्याचा वापर करून प्लास्टिकची पतंग उडवीनार्यावर तात्काळ योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी यांकरीता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव बादल बेले यांच्या नेत्रुत्वात राजू-याचे तहसिलदार हरिश गाडे , राजुरा नगर परिषदचे नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना निवेदन देण्यात आले. 🟩🟢🟡🌀🌼यावेळी संतोष देरकर ,तालुका अध्यक्ष ,शहर अध्यक्ष संदीप आदे ,तालुका संघटक मनोज तेलिवार ,शहर संघटक उमेश लढी, तालुका महिला सचिव अँड.मेघा धोटे, तालुका महिला संघटीका सूनैना तांबेकर, शहर संघटक आशीष करमरकर ,संदीप पोगला शहर संघटक आदिंची उपस्थिति होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here