🟨🟢मकर संक्रांत🟢🟨
🟨🟪चंद्रपूर🌼किरण घाटे🟨🟩 🟨
आज मकर संक्रांत ! भारतीय महिलांचा आवडता सण!
ताे राज्यात १४जानेवारीला सर्वत्र साजरा केला जाताे .💠🟡याच दिनाचे औचित्य साधुन चंद्रपूरातील शिक्षिका भुवनेश्वरी गाेपमवार धर्मपुरीवार यांनी मकर संक्रांत हा एक लेख शब्दांकित केला आहे. ताे खास वाचकांसाठी येथे देत आहाे ! 🟨🌼🟢🌼🌼🌼
मकर संक्रांत दरवर्षी ही 14 किंवा 15 जानेवारीला येतं असते याही वर्षी ही 14जानेवारी गुरुवार ला आलेली आहे. सुर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या पर्वाला मकर संक्रांत म्हणतात.असे म्हणतात की संक्रांतीच वाहन असते तर भगिनींनो या वर्षीच मुख्य वाहनं सिंह तर उपवाहन गज आहे व ती बाल्य अवस्थेत आलेली आहे.
🟣🟨🌀🌼 प्राचिन काळी स्त्रियांना कामातुन सवड मिळतचं नसे! मग त्यांना स्वतःकडे लक्ष देता यावं,चार चौघात मिसळता यावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी,! मकर संक्रांत निमित्त हळदीकुंकू व वाणाच देवाणघेवाण ही पध्दत विस्तृत स्वरुपात उदयास आली.☀️🟨💠संक्रांत म्हणजे स्त्रियांचा आवडता सण जानेवारी महिन्यात संक्रांत पासुन तर रथसप्तमी फेब्रुवारी महिन्यापर्यंत हळदीकुंकूला बोलावतात.☀️💠🟣🌀🛑🔷 घरोघरी हळदीकुंकू च्या कार्यक्रमाचं आयोजन केल्या जाते .त्या निमित्ताने स्त्रिंया घराबाहेर पडायला लागलेल्या,स्वताःसाठी वेळ काढायला लागल्या!अहो -अहो करुन ज्याच्यासाठी राबायच्यां त्यांचं नाव लाजुन उखाण्यात अलगद आेंठावर घेण्यात येवु लागलं.मकर संक्रांत म्हणजे सौभाग्याचं लेणं असं म्हटल्या गेल.🟨🔷🟢🟡☀️नववधु पहिल्या पाच वर्षी ठरविलेल्या प्रमाणे वाण देतं असे म्हणजेच पहिल्या वर्षी हळदीकुंकू, दुसऱ्या वर्षी बांगड्या , तिसऱ्या वर्षी आरसा कंगवा, चौथ्या वर्षी खिचडी तर पाचव्या वर्षी नारळ लुटल्या जायचं त्यांनंतर आपल्याला जमेल ती वस्तु द्यायची.! 🌀🟣🟢🛑🟡वाणाची पध्दत थोडीफार वेगळी जरी असेल तरी वाण लहान असेल तरी याची उत्सुकता सर्वांना असे प्राचिन काळात स्टिल ,गृहपयोगी वस्तु पध्दत होती .पण आधुनिक काळात त्याचं स्वरूप पालटत गेलं.
🌼☀️🌀🛑🟢आधुनिक काळात पर्यावरण पुरक इकोफ्रेंडली वाण देण्याची पध्दत विकसित होत आहे.उदा. कुंड्या, विविध प्रकारचं तुळसीच रोपं यावर्षी तर कॅलरफुल माँस्क,स्कार्फ इ. इकोफ्रेंडली वाणात सुपारीच्या झाडापासून बनवलेल्या प्लेट,वाटल्या,ताट याप्रकरचे स्वतः तसेच उत्तम व आरोग्यदायी असते.💠🌼🟨🟡आधुनिक काळात हळदीकुंकां निमित्त त्याच्यातील कलागुणांना वाव मिळायला लागली .तसेच हळदीकुंकू कार्यक्रमास विस्तृत स्वरुप प्राप्त होत गेले. समाजाच वाण, सामाजिक क्षेत्रातील वाण, लहान बाळाची लुट,तिळव्यांचा कार्यक्रम या कार्यक्रमाचे आयोजन विविध सजावटीने केले जायचे .💠🌼🟪🟡नव नवीन वाण कस देता येईल, कोणकोणते कार्यक्रम घ्यायचे हे सुध्दा ठरवायला लागल्या,!मग वस्तुचे आदानप्रदान काय, स्वतःतील रुसवे फुगवे. दुर करुन एकमेकांना तिळगूळ घ्या गोड गोड बोला याचं आग्रह करु लागल्या.
🟨💠🟩🟢🟪रांगोळी काय ॽ उखाणे काय,ॽ गाणं काय,ॽ नृत्य कायॽ,खेळ कायॽ नटणेॽ काय थटणेकायॽ विचारमंच काय असे विस्तृत स्वरुप मकर संक्रांतीच्या हळदीकुंकवाला प्राप्त होत गेलं.
यानिमित्ताने माझ्या भगिनींना मला एवढंच म्हणावंसं वाटतं.
☀️🌀कर बुलंद आवाज
अगर बाजु मे दम है ।☀️🌀
हमे भी जमाने को दिखा देना है🌀☀️
हम किसीसे कम नहीं ।।☀️🌀
।🌼 तिळगूळ घ्या नी गोड गोड बोला ।🌼
💠🛑🟢भुवनेश्वरी गोपमवार धर्मपुरीवार🟡चंद्रपुर
शिक्षिका सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर