दुचाकीच्या समोरासमोर धडक एक जागीच ठार चार गंभीर जखमी
मुल तालुक्यातील ताडाळा रोडवरील महाबिज जवळील घटना
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर ताडाळा रोडला असलेल्या महाबीज जवळ समोरासमोर झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मुल वरून होंडा पॅशन क्रमांक एम एच 34 ए एफ 45 37 या दुचाकीने चक दुगाळा येथे जात असलेले स्वप्निल गुज्जनवार आणि लोबान रामटेके तर विरुद्ध दिशेने गडीसुरला वरून होंडा सीडी 110, एम एच 34 बी 97 11 या दुचाकीने येत असलेले अनिल झरकर, चंद्रशेखर निकुरे, रवींद्र कावळे यांची समोरासमोर धडक झाल्याने 28 वर्षीय स्वप्निल गुज्जनवार रामपूर येथील रहिवासी जागीच ठार झाला तर चंद्रशेखर निकुरे आणि रवींद्र कावळे हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच मुल पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन सर्वांना उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन गेले. गंभीर जखमींना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर लोभान रामटेके आणि अनिल झरकर यांना मुल येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. चंद्रशेखर निकुरे आणि रवींद्र गावडे यांची प्रकृती चिंताजनक असून या घटने चा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र डोंगरे, पोलीस हवालदार श्रीधर मडावी, राजेंद्र शेंडे करीत आहे.