अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
मातोश्री महिला महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनी युवा पंधरवाड्याचे उद्घाटन
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे दिनांक १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमाँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त राष्ट्रीय युवा पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर तर अतिथी म्हणून प्राचार्य नितेश रोडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली, प्रसंगी अतिथी नितेश रोडे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांचा वारसा युवा पिढीने नेटाने पुढे चालवत असताना स्वामी विवेकानंद यांचे चैतन्य निर्माण व्हावे असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले, प्रसंगी पंधरवड्यात आयोजित व्याख्यान, निबंध, भित्तीपत्र, वादविवाद स्पर्धा व इतर कार्यक्रमांची माहिती देण्यात आली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा अभय दांडेकर यांनी तर संचालन प्रा सपना जयस्वाल व आभार प्रा अश्विनी चौधरी यांनी मानले,कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी व कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले.