आवाळपुर गावचे तंटामुक्त समिती अध्यक्षाचे काम ठरतेय गावासाठी वरदान
‘बाळकृष्ण कवडुजी काकडे’ यांच्या तंटामुक्ती अध्यक्षतेखाली पोलीस तक्रारींचे प्रमाण अत्यल्प असून गावातील प्रकरण गावात सोडविण्यात यशस्वी.
आवाळपुर
महात्मा तंटामुक्त गाव मोहिमेचा मूळ उद्देशच सामोपचाराने तंटे मिटविणे असा आहे. राज्यातील एकूणच तंटय़ांचे प्रमाण लक्षात घेतल्यास त्यात फौजदारी तंटय़ांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे लक्षात येते. या मोहिमेंतर्गत ज्या फौजदारी तंटय़ांचे लोकसहभागातून निराकरण केले जाऊ शकते, त्याची कार्यपद्धती शासनाने आखून दिली आहे. प्रत्येक तंटामुक्त गाव समितीने या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम करणे अपेक्षित आहे. तंटय़ांचे स्वरूप कोणतेही असले तरी त्यात समितीचे अध्यक्ष व निमंत्रक यांना महत्त्वाची भूमिका निभवावी लागते.
याच प्रकारच्या भूमिकेतून मागील तीन वर्षांपासून आवाळपुर गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी असलेले तरुण नेतृत्व ‘बाळकृष्ण कवडुजी काकडे’ यांचे कार्य गावासाठी वरदान ठरत असून गावातील तंटे गावातच सोडविण्यात त्यांचा हातखंडा दिसून येत आहे. मागील तीन वर्षांपासून गावातील तंटे गावात सोडावीत पोलीस स्टेशन पर्यंत तक्रारी होण्याचे प्रमाण घटल्याची माहिती प्राप्त आहे.
गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे लोकं अपेक्षेने येतात. याचेच भान ठेवून बाळकृष्ण काकडे हे 24 तास उपलब्ध राहून गावासाठी झटताना दिसून येत आहे. अनेकदा तर लोक ग्रामपंचायत कामा करीता सुद्धा त्यांच्याकडे धाव घेतात. गावातील अनेक प्रकारचे प्रश्न हे बाळकृष्ण काकडे सोडविण्याचा प्रयत्न करीत असून प्रत्येकाला मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.गावातील प्रकरणे गावात सोडविण्यात त्यांचे कार्य बघता तं. मु. स. अध्यक्षत बाळकृष्ण कवडुजी काकडे यांचे कार्य गावासाठी वरदान ठरत असल्याची चर्चा गावात होताना दिसून येत आहे.