गोंडपिपरी तालुक्यातील चेकबेरडी ग्रामपंचायत बिनविरोध
गोंडपिपरी(सुरज माडुरवार)
कोरोना काळामुळे विलंब झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्रामीण भागात प्रचाराला वेग आला आहे.दरम्यान तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक घोषित झालेल्या ४३ ग्रामपंचायतींपैकी चेकबेरडी गावातील नागरिकांसह उमेदवारांनी निवडणुकीपासून दुर राहात गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पक्षभेद मतभेद आणि गट-तट विसरून एकत्र येत सर्व सदस्यांची बिनविरोध निवड करून आदर्श निर्माण केला आहे.
४३ ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत ७ सदस्यीय चेकबेरडी ग्रामपंचायत अविरोध झाल्यामुळे ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार असून .गोंडपीपरी तालुक्यात ३३७ जागेसाठी निवडणूक होणार असून ८४९ उमेदवार रिंगणात उभे होते त्यापैकी ५९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.चेकबेरडीतील मीनाक्षी खरबनकर,शँकर खरबनकर,पब्लिका सोयाम,योगेश कोरवते,माया मडावी,प्रशांत कन्नके, जीवन सोयाम या ७ उमेद्वारांसह सह तालुक्यातील एकंदरीत ३९ उमेदवार बिनविरोध निवडून आले.२९८ जागेसाठी मतदान होणार असून याकरिता ७५१ उमेदवार आपले भाग्य आजमावनार आहेत. तालुक्यातील अविरोध निवडणूक झालेल्या एकमेव ग्रामपंचायत चेकबेरडी चे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी विकासकामासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ असा शब्द दिला.तालुक्यातील निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा असे आव्हाहन तहसीलदार के.डी मेश्राम, ठाणेदार संदिप धोबे यांनी केले आहे.