लेखणी महिला मंडळ बल्लारपूर तर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

0
633

लेखणी महिला मंडळ बल्लारपूर तर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

महेंद्र बेताल । क्रांतिजोती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका 03 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस त्या निमित्ताने लेखणी महिला मंडळातर्फे सावित्रीबाईना मानवंदना देण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व पहिला महिला शिक्षिका दिनानिमित्त लेखणी महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ सोनाली घडसे यांच्या अध्यक्षतेखाली जयंती कार्यक्रम घेण्यात आले.
कु. अधीरा वाघमारे, श्रुतिका गायकवाड, क्षितिजा मुन, प्रशस्ती ढोरे यांनी सावित्रीबाई च्या वेश परिधान करून कविता, भाषण व गायन द्वारे सर्वांचे मन जिंकले.
स्त्रियांना व लहान मुलींना तसेच उपस्थित असलेल्या जनसमुदायला आजच्या घडीला होणाऱ्या घडामोडींची माहिती देण्यात आली. पुरुषाप्रमाणेच स्त्रीयचेही वर्चस्व बद्दलची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला योगिता धोपटे, नीलम वाघमारे, सीमा डंबारे, राणी शंभरकर, शिल्पा हूमणे व लेखणी महिला मंडळाचे सर्वं सन्माननीय पदाधिकारी / सद्स्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते. सुत्र संचालन सौ स्वाती मुन यांनी केले. व आभार प्रदर्शन सौ दीक्षा गायकवाड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here