सामाजिक क्रांतिच्या अग्रदुत क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
चंद्रपूरात तब्बल १००रणरागिनींचा सत्कार
☀️🟩🌼चंद्रपूर🟣🌼किरण घाटे🟨☀️सावित्री बाई फुले यांनी अलाैकिक , दैदीप्यमान व युगप्रवर्तक कार्य केले म्हणून ख-या अर्थाने त्या भारतीय समाजातील युगस्रि मानल्या गेल्या त्यांचे कार्य अमुल्य व महान असुन ते कदापिही विसरण्या सारखे नाही .असे मनाेगत राज्याचे मदत -पुनर्वसन बहुजन कल्याण व इत्तर मध्यमवर्गीय तथा चंद्रपूरचे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले .ते क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले राष्ट्रीय उत्सव समिती चंद्रपूरच्या वतीने आज रविवार दि .३जानेवारीला स्थानिक जाेड देऊळ पठाणपुरा देवस्थान सभाग्रूहात दुपारी आयोजित क्रांतिज्याेति सावित्रीबाई फुले जयंती व प्रथम महिला शिक्षिका दिन समाराेहात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरुन बाेलत हाेते .🟨💠🛑या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी , वराेरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानाेरकर , सिडीसीसी बँकेचे संचालक संदीपभाऊ गड्डमवार ,महाराष्ट्र फाऊँडेशनच्या पुरस्कार प्राप्त तथा सुपरिचित कवयित्रि व लेखिका अरुणाताई सबाने आदि उपस्थित हाेते . 🛑🟣🟩🟨या वेळी आमदार अभिजित वंजारी , आमदार प्रतिभाताई धानाेरकर यांनी आपल्या भाषणातुन सामाजिक क्रांतिच्या अग्रदूत क्रांतिज्याेति सावित्रीबाई फुले यांचे जिवन कार्यावर आपल्या अल्पश्या भाषणातुन प्रकाशझाेत टाकला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण नंदु नागरकर यांनी केले .🟣☀️🟩🟨आयोजित करण्यांत आलेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमात विविध क्षेत्रात सर्वोत्तम ,उल्लेखनिय व नेत्रदिपक काम करणां-या चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १००रणरागिंनींचा या वेळी पालकमंत्री व इत्तर मान्यवर मंडळीच्या शुभ हस्ते सन्मानपुर्वक सत्कार करण्यांत आला .☀️🛑🟣चंद्रपूरात प्रथमच क्रांतिज्याेति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा एवढा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यांत आला हाेता .याच कार्यक्रमात आयोजन समितिच्या वतीने आमदार अभिजित वंजारी यांचा सत्कार करण्यांत आला .🟣🟨🌀काेराेना नियमाचे पालन प्रत्येकांनी या वेळी केले एकंदरीत आजचा कार्यक्रम विशेष लक्षणिय ठरला .🌼🛑🟣चंद्रपूरचे प्रख्यात अधिवक्ता दत्ता हजारे व अँडव्हाेकेट पुरुषोत्तम सातपुते यांनी आेबीसी बाबतचे एक निवेदन आमदार अभिजित वंजारी यांना या वेळी सादर केले अनेक मान्यवर मंडळी कार्यक्रमाला हजर हाेती .जाेड देऊळ देवस्थान सभाग्रूह उपस्थितितांच्या गर्दीने गच्च भरले हाेते .