चंद्रपूर जिल्ह्याचे वातावरण पूर्णता भ्रष्ट व दुषित झाले : काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेश पुगलिया यांचा स्पष्ट आराेप
विदर्भ मजदूर किसान काँग्रेसचा धरणा कार्यक्रम ; शेकडाेंची उपस्थिती
🟣🟢🟪चंद्रपूर🔵किरण घाटे🟡 ☀️महाराष्ट्राच्या निर्मिती नंतर तत्कालीन मुख्यमंत्री तसेच स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब कन्नमवार यांच्या नेत्रूत्वात चंद्रपूर गडचिराेली जिल्हा एकत्रित असतांना या जिल्ह्यात औद्योगिक क्रांति जाेमाने झाली .🟥🟩🟨एव्हढेच नाहीतर इत्तर विकासांच्या कामात या आदिवासी बहुल जिल्ह्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली.त्या नंतर काँग्रेसचे व विरोधी पक्षाचे नेते या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभले .🟡🟣🌀चंद्रपूर जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात आजच्या घडीला विकासभाऊ आमटे , प्रकाशभाऊ आमटे या शिवाय चंद्रपूरची कन्या व जावई डाँ .राणी बंग व डाँ .अभय बंग ही संपूर्ण मंडळी तनमनाने श्रध्देय बाबा आमटेंचा वारसा सातत्याने जपत आहे .समाजकारणात व राजकारणात हा चंद्रपूर जिल्हा नेहमीच अग्रकमी राहिलेला आहे.🟡🟢🔵🟣विकासभिमुख तसेच औद्योगिक जिल्हा म्हणून आेळखल्या जाणां-या व जनतेसाठी चांगले व पाेषक वातावरण असतांना या चंद्रपूर जिल्ह्यातील वातावरण मात्र आता पुर्णता भ्रष्ट व दुषित झाले असल्याचा स्पष्ट आराेप चंद्रपूरचे भूतपूर्व खासदार तथा काँग्रेस चे दिग्गज नेता नरेश पुगलिया यांनी प्रसिध्दीसाठी दिलेल्या एका पत्रकातुन केला आहे .🔵☀️🟩🌀🟣दरम्यान आज साेमवार दि .२८ डिसेंबरला सकाळी ११वाजता येथील स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभाग्रूहाच्या समिप असलेल्या राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांचे पुतळ्या जवळ विदर्भ मजदूर किसान काँग्रेसच्या वतीने धरणा आंदोलन करण्यांत आले हाेते. 🔵☀️🟣काेराेना महामारी कडे दुर्लक्ष , अमली पदार्थांची तस्करी , काेळसा तस्करी , दारु तस्करी , अवैध रेतीची तस्करी ,हत्या व गुन्हेगारी या मध्ये झालेली वाढ या सर्व समस्यांवर आळा घालून या जिल्ह्यात सदैव शांतता नांदावी .या मागणीसाठी धरणा आंदोलनाचे आयाेजन करण्यांत आले हाेते.🌀☀️🔵☀️🟣चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकादा सक्षम, प्रामाणिक ,चारित्र्यवान मंत्री द्यावा अशी मागणी देखिल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे पाठविलेल्या एका निवेदनातुन भूतपूर्व खासदार तथा कामगार नेते नरेश पुगलिया यांनी केली आहे .☀️🟣🔵लक्षवेधुन घेणां-या आजच्या या आंदाेलनात विदर्भ मजदूर किसान काँग्रेसच्या शेकडाे महिला व पुरुषांनी आपला सहभाग नाेंदविल्यांचे चित्र प्रत्यक्षात चंद्रपूरात दिसून आले.