चंद्रपूरात नाताळ सणावर काेराेनाचे संकट ! बाजारपेठही या वर्षि गर्दीने फुलली नाही !
चंद्रपूर
✍🏻किरण घाटे
नाताळ म्हटला की सांता क्लाज , क्रिसमस ट्री ,डाेळे दिपवणारे मनाेवेधक स्टार आपल्या डाेळ्यांसमाेर तरंगते त्यातल्या त्यात याच पवित्र सणाला झिंगल बेल , झिंगल बेल हे मधुर व गाेड गीत कानावर पडते .
शांतता व एकाेप्याची भावना निर्माण करणारा हा सण अर्थातच नाताळ हा सण!
दरवर्षि जगभरात आनंदाने , भक्ती भावाने व उत्साह पुर्वक साजरा केला जाताे .परंतु या वर्षि राज्यात महाभयानक काेराेनाचे संकट उभे झाल्यामुळे प्रत्येक सणा प्रमाणे हा देखिल ( नाताळ)सण ख्रिस्ती बांधव माेठ्या प्रमाणात साजरा करु शकले नाही .अगदीच साधेपणाने हा सण साजरा करीत आहे हे तितकेच खरे आहे.
आज गुरुवार दि.२५डिसेंबरला चंद्रपूरातील मुख्य मार्गावर असलेल्या संत अंद्रियाचे देवालय येथे दुपारी या प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट दिली असता या देवालयाचे मुख्य प्रवेश दार बंद असल्याचे द्रूष्टीक्षेपात पडले .परंतु या देवालयात भक्त गण माेठ्या संख्येने दर्शनार्थ येत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले .या सर्व भाविकांना आल्या पावलीच घरांकडे परतावे लागले.
नाताळ सणाला दरवर्षि चंद्रपूरची बाजारपेठ गर्दी फुलुन दिसते परंतु या वेळेस बाजारपेठेत म्हणावी तशी गर्दी दिसून आली नाही .अनेक ख्रिस्ती बांधवांनी काेराेनाचे संकट बघता घरीच नाताळ सण साजरा करण्यांचे ठरविले .
ब-याच जणांनी एकमेकांना व्हाँटसअपच्या संदेशातुन व भ्रमणध्वनीच्या माध्यमांतुन या सणाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या !
“जिल्हा प्रशासनाचे सर्व सुचनाचे पालन करुन भक्तगणांनी प्रशासनास सहकार्य केले हे तेवढेच खरे ! ..”