- रक्तदान करून पोलीस प्रशासनाने केले जीवनदानाचे कार्य
=चिमूर पोलीस स्टेशनचा स्तुत उपक्रम
= 115 रक्तदात्यनि केले रक्तदान
विकास खोब्रागडे
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चिमुर अंतर्गत चिमूर पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिर नुकतेच घेण्यात आले.देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आल्याने यात अनेक नागरिकांचे रक्ता अभावी जीव गेलेत. जिल्ह्यात रक्ताचा पुरवठा कमी होऊ नये, व रक्तामुळं कोणाचे जीव जाऊ नये. म्हणून चिमूर पोलिसांनी पहिल्यांदाच रक्तदान शिबिर घेऊन स्तुत असा उपक्रम राबविण्यात आला. यामुळं चिमूर पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सुचने नुसार रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात जीवनज्योती नागपूर येथील रक्तसंक्रमन अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात.115 युवकांनी रक्तदान केले. पोलीस प्रशासनाने रक्तदान शिबिर घेऊन जीवनदानाचेच कार्य केले आहेत. सदर रक्तदान शिबिराला उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे उपस्थित होते. तर चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ठाणेदार रवींद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश मोहोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू गायकवाड़, अलीम शेख यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवून काही पोलीस अधिकाऱयांनी व कर्मचाऱ्यानी सुद्धा रक्तदान केलेत. यावेळी तालुक्यातील पत्रकार मंडळी उपस्थित होती.