महानगरपालिका स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासिकेतील कोरोना सारख्‍या कठीण काळात दोन विद्यार्थ्‍यांची शासकीय सेवेत निवड

0
740

महानगरपालिका स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासिकेतील कोरोना सारख्‍या कठीण काळात दोन विद्यार्थ्‍यांची शासकीय सेवेत निवड

विद्यार्थ्‍यांचा महानगरपालिकेने केला सन्‍मान

अमरावती
प्रतिनिधी /देवेंद्र भोंडे

अमरावती : महानगरपालिकेच्‍या स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासिकेतील दोन विद्यार्थ्‍यांची शासन सेवेत निवड झाली आहे. स्‍पर्धा परिक्षा केंद्र सुरु केल्‍यानंतर महापालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून शहरासह अन्‍य जिल्‍ह्यातून अमरावतीत शिक्षणाकरीता येणा-या विद्यार्थ्‍यांना याचा लाभ मिळत आहे.

मनपाच्‍या महिला व बालविकासाकडुन आयुक्‍त बंगल्‍याचे मागे 10 वर्षापूर्वी स्‍पर्धा परिक्षा ग्रंथालय व अभ्‍यासिका केंद्र सुरु करण्‍यात आले. मनपाच्‍या या नाविण्‍यपुर्ण स्‍पर्धा परिक्षा अभ्‍यासिकेमुळे सचिन काळे यांची महाझनको टेक्‍नीशियन 3 या पदी निवड झाली आहे. तसेच अविनाश अंबाडकर यांची महावितरण मध्‍ये उपकेंद्र सहाय्यक या पदी निवड झाली आहे. या विद्यार्थ्‍यांनी सरळ सेवा माध्‍यमातून घेण्‍यात आलेल्‍या भरतीत यश मिळवले. सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे यांनी पुढाकार घेऊन काही वर्षापूर्वी स्‍पर्धा परिक्षा क्षेत्रात करिअर करु ईच्‍छीणा-या शहरातील गरीब व होतकरु विद्यार्थ्‍यांसाठी स्‍पर्धा परिक्षा व अभ्‍यासिका या केंद्राची उभारणी केली. मनपा स्‍पर्धा परिक्षा व अभ्‍यासिका हा महाराष्‍ट्रातील नाविण्‍यपुर्ण उपक्रम ठरला आहे. या उपक्रमामार्फत शेकडो विद्यार्थी शासकीय सेवेत विविध पदांवर रुजू झालेले आहे. यश प्राप्‍त केलेल्‍या विद्यार्थ्‍यांचे मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी रोप देऊन कौतुक व सत्‍कार केला. तसेच उपस्थित सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे यांनी सुध्‍दा विद्यार्थ्‍यांचे कौतुक केले. या यशामुळे केंद्रावरील अधिक विद्यार्थ्‍यांना प्रेरणा मिळेल व अधिकाअधिक यश मिळेल अश्‍या शुभकामना व्‍यक्‍त केल्‍या.

यावेळी उपआयुक्‍त सुरेश पाटील, मुख्‍यलेखापरिक्षक राम चव्‍हाण, महिला व बाल कल्‍याण अधिकारी नरेंद्र वानखडे, डॉ. जयश्री नांदुरकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here