आदिवासी सेवा सहकारी संस्थेत शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
30 वर्षांपासून कार्यरत संस्था सिद्धेश्वर येथे हलवण्यास विरोध
प्रतिनिधी । राजुरा तालुक्यातील आदिवासी सेवा सहकारी संस्था देवाडा येथे असून याला सिद्धेश्वर येथे स्थलांतरित करण्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.जिल्हा मध्यवर्ती बँकची संस्था देवाडा येथे मागील ३० वर्षांपासून कार्यरत असून परिसरातील १७ गावातील शेतकऱ्यांना शेतीचे आधारे पीक कर्ज व ईतर व्यवहार याच संस्थेच्या मार्फत होते आता ही संस्था मौजा देवाडा येथून शिदेश्वर येथे हलवण्याचा निर्णय येथील संचालक मंडळाने घेतला.
या निर्णयाच्या विरोधात गोंडवाना गणतंत्र पार्टी व मित्र पक्ष आणि परिसरातील शेकडो शेतकरी मोजा देवाडा येथे ठिय्या आंदोलन करून सदर निर्णय रद्द करण्याची मागणी केली. आंदोलनांनंतर संचालक मंडळाच्या पदाधीकाऱ्यानि देवाडा येथील आदिवासी संस्था देवाडा येथेच ठेवण्याचे आश्वासण दिले.
या प्रसंगी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते माजी पंचायत समिती सद्स्य अब्दुल जमीर अब्दुल हमीद ,देवाड्याचे माजी सरपंच माणिक कुलसंगे,अब्दुल रशीद ,व तसेच मित्र पक्षाचे ईश्वर मुंडे श्रीनिवासन मंथनवार,फारुख शेख पाटण,वसंत आत्राम,विस्नू घुले हे प्रामुख्याने उपस्थित होते.