चिमूर पोलीस स्टेशन च्या कर्मचारीवर्गणीतून
केली मृत शेळी मालकास केली
आर्थिक मदत
चिमूर पोलीस स्टेशन चा सामाजिक उपक्रम
विकास खोब्रागडे
चिमूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या चिमूर मासळ रस्त्यावर मागील महिन्यात चिमूर येथील एक गरीब शेतकरी असलेल्या शंकर तळवेकर यांच्या शेळ्या बसच्या धडकेने ११ शेळ्या मृत पावल्या होत्या. त्यांचे वर आर्थिक संकट कोसळले याची दखल उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून माणुसकी दाखवीत सामाजिक उपक्रम च्या पुढाकार घेत चिमूर पोलीस स्टेशन कर्मचारीवर्गणी च्या माध्यमातून २१ हजार रुपयांची मदत निधी शंकर तळवेकर यांना देण्यात आली.
मदतनिधी देत असतानाच्या छोट्याश्या कार्यक्रमात पोलीस उपविभागीय अधिकारी बगाटे, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड पोलीस उपनिरीक्षक कांता रेजिवाड मॅडम आदी उपस्थित होते.
कायदेशीर रित्या एसटी महामंडळ कडून शंकर तळवेकर यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी बगाटे यांनी दिले
या कार्यक्रम दरम्यान सामाजिक सुधार फौडेशन चे प्रदीप बंडे यांनी सुद्धा शंकर तळवेकर यांना आर्थिक मदत दिली