गाव – नकाशामध्ये रस्ता दर्शविण्याची मागणी…अरुण लोहकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले निवेदन
विकास खोब्रागडे
चंद्रपूर/- भारत देशात ७० टक्के शेतकरी आहेत. शेतक-यांचा महत्त्वाचा प्रश्न शेतक-यांना शेती करण्यासाठी ये-जा करण्यास रस्ता असणे आवश्यक आहे. परंतु, प्रत्येक गावातील गाव
नकाशामध्ये रस्ता दर्शक नकाशा नाही. शेतक-याचे वादविवाद सर्वात जास्त होत असल्याने गाव नकाशा करण्याची मागणी अरुण लोहकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.गाव नकाशा मध्ये रस्ता दर्शविलेला नाही. त्यामुळे खालील भागाचा शेतकरी वरच्या व आजुबाजुच्या शेतक-यांचा रस्ता अडवून, झगडा भांडण करून, डोके फोडून, पोलिस स्टेशन, तहसिल कार्यालय,उपविभागीय अधिकारी कार्यालय व न्यायालयात चकरा मारीत असतात. चौकशी होते, परंतु संबंधित प्रश्नाचा गाव
नकाशामध्ये रस्ता नसल्यामुळे संबंधित विभाग प्रश्न सोडविण्यास असमर्थ ठरतात.सत्तेची अदलाबदल होत आहे परंतु संबंधित प्रश्नावर आजही जैसे थे! परिर्थिती आहे व वर्षानुवर्षे रस्त्याचा प्रश्न सुटत नाही. शासन स्मार्ट सिटीकडे लक्ष घालीत असते. परंतु स्मार्ट शेती करणा-यांकडे सर्वाचे दुर्लक्ष होत आहे. सर्व शेतक-यांच्या प्रश्नाचे मुख्य समस्या पांदण रस्त्याची निर्मीती करणे.प्रामुख्याने वरील सर्व प्रश्न सोडविण्याकरिता प्रत्येक गावातील गाव नकाशाचा शोध घेवून शासनाने त्वरित गाव नकाशामध्ये रस्ता दर्शविणे आवश्यक आहे व शेतक-यांचा शेतीचा वहीवाट करण्यास पांदण रस्त्याची निर्मीती करणे, असे सर्व झाल्यास ख-या अर्थाने शंतक-याची स्मार्ट शेती झाल्याशिवाय राहणार नाही. शासनाने गाव नकाशा मध्ये रस्ते दर्शविण्याची मागणी अरुण लोहकरे ,अमित जुमडे यांनी केली आहे.