महिलांसाठी 8080809063 हेल्पलाईनवर आरोग्यविषयक माहिती उपलब्ध
‘तरंग सुपोषित महाराष्ट्र’ अंतर्गत महिला व बालविकास विभागाचा अभिनव उपक्रम
चंद्रपूर, दि. 18 डिसेंबर : ‘तरंग सुपोषित महाराष्ट्र’ हा महिला व बालविकास विभागाचा उपक्रम असून इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम वर बनवला गेला आहे. याअंतर्गत 8080809063 हा हेल्पलाईन क्रमांक तयार केला गेला आहे. ह्या नंबर वर कॉल केल्यास गर्भवती व स्तनदा महिला, किशोरी मुली तसेच शून्य ते सहा वर्षाचे बालके यांच्या आरोग्य व पोषण संदर्भात मार्गदर्शन केले जाते.
हा हेल्पलाईन क्रमांक प्रत्येक पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस तसेच आपल्या प्रत्येक लाभार्थ्याच्या मोबाईल मध्ये सेव केलेला पाहिजे. काहीही अडचण आल्यास तसेच मार्गदर्शन हवे असल्यास ह्या नंबर वर कॉल करून किंवा व्हाट्सअप द्वारे सुद्धा आपण मार्गदर्शन पर मेसेज व व्हिडिओ मिळवू शकतो, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.