चंद्रपूर ते गडचिरोली राष्ट्रिय महामार्गाचे काम तत्काळ सुरु करा – आ. किशोर जोरगेवार
अधिका-यांना ताकीद, कामात अनियमीतता आढळल्यास एकही मशनरी परत जाऊ देणार नाही
चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग चंद्रपूर ते गडचिरोली आणि चंद्रपूर ते बल्लारशाह या महा मार्गाच्या कामात अनियमीतता आढळून येत आहे. त्यामूळे नागरिकांना प्रंचड त्रास सहन करावा लागत आहे. या पूढे ही बाब खपऊन घेतली जाणार नाही. या मार्गाचे काम तात्काळ सुरु करुन दोन महिण्यात सदर मार्ग वाहातूकीसाठी सुरळीत करा अन्यथा कामासाठी आलेली एकही मशनरी परत जाऊ देणार नाही असा ईशारा आ. किशोर जोरगेवार यांनी दिला आहे. या कामा संदर्भात आ. जोरगेवार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोली, महाराष्ट्र राज्य, याचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा यांना बोलावून चांगलीच ताकीद दिली आहे. यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर चोपडे, व्यवस्थापक अभियंता उदय कुमार, उपकार्यकारी अभियंता मत्ते आंदिची उपस्थिती होती.
चंद्रपूर येथील वरोरा नाका उड्डाणपूल ते सावरकर चौक होत बगांली कॅम्पला जोडणा-या राष्ट्रीय महामार्गाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक कार्यालयाच्या माध्यमातून सुरु आहे. मात्र हे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी येथे अपघाताचे प्रमाणही वाढले असून अनेकांना अंपगत्व आले आहे. असे असले तरी सदर कंत्राटदाराकडून या रोड निर्माण कामात ढिलाई करण्यात येत आहे. यावर आता चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आ. किशोर जोरगेवार हे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी आज सदर कंपणी व्यवस्थापणाच्या अधिकाऱ्यांची क्लाॅस घेतली. यावेळी आ. जोरगेवार यांनी कामाच्या सध्यस्थितीवर चांगलीच नाराजी व्यक्त केली. ईतर काम पूर्ण करण्यासाठी हे काम तात्काळत ठेवल्या जाणे योग्य नसल्याचे यावेळी जोरगेवार म्हणाले, येथील वाहतूकीची रेलचर आणि अपघाताचे प्रमाण लक्षात घेता या कामाला गती देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी अधिका-यांना दिले. येथील रोडच्या कामासाठी वापरण्यात येणा-या मशनरी दूसरीकडे नेण्याचा कट असल्याचेही यावेळी जोरगेवार म्हणाले, मात्र हे काम पूर्ण झाल्या शिवाय एकही मशीन हालू देणार नाही अशी ताकीदच आ. जोरगेवार यांनी अधिका-यांना दिली असून हे काम तात्काळ सुरु करुन दोन महिण्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहे. कंपणी व्यवस्थापणानेही आज पासूनच या कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन यावेळी आ. किशोर जोरगेवार यांना दिले आहे. या रोड निर्माणच्या कामाबाबत आ. किशोर जोरगेवार यांनी घेतलेली आक्रमक भूमीका सदर रोड निर्माण कामाला गती प्रधान करेल अशी आशा आता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही आ. किशोर जोरगेवार यांनी बंगाली कॅम्प ते रामनगर पोलीस चौकी पर्यंतचे काम स्वतः उभे राहून सुरु करायला लावले होते हे हि विशेष.