कोरोना संकटात आकाश बनला गावातील मुलांसाठी ज्योतिबा
घरीच केली शाळा सुरु;विदयार्थ्यांना मिळाला आधार,
आशिष गजभिये.
चिमूर
शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे.परंतु ग्रामीण भागातील मुलांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहचत नाही यामुळे खंडाळा येथील एका शिक्षित युवकाने शिक्षणासाठी पुढाकार घेत मुलांसाठी तो ज्योतिबा बनला.गावात इतरत्र भटकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना एकत्र करून अध्यपन सुरू केले आहे.
तालुक्यातील खंडाळा या छोट्याश्या गावातील आकाश श्रीरामे हा युवक विद्यार्थ्यांसाठी आधुनिक ज्योतिबा ठरला आहे.समाजकार्याची पदवी घेतलेला हा युवक सद्या आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करीत असतो.आकाशाला गावातील वास्तव परिस्थितीची जाणीव आहे.कोविड-१९ या विषाणूजन्य आजाराच्या प्रादुर्भावामुळे शिक्षणात अडथळे निर्माण झाले आहेत. आद्यपही १ली ते ८ वी पर्यंतची राज्यभरातील शाळां बंद आहे. शाळा बंद ,पण शिक्षण सुरू हा शिक्षण विभागाचा उपक्रम सूरु आहे.
ग्रामीण भागात अनेक पालकांकडे स्मार्टफोन नाही.त्यामुळे ऑनलाइन शिक्षणापासून खेड्यातील मुलं वंचित आहेत. त्याला संचारबंदीच्या काळात गावातील मुलं शाळा बंद असल्याने मनसोक्त खेळाताना जाणवले. ही मुलं अभ्यासपासून खूप लांब जात असल्याचे आकाशने ओळखले. आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग या विद्यार्थ्यांना व्हावा ही समाजीक जाणीव ओळखून याबाबत त्याने विद्यार्थ्यांच्या पालकांशी सवांद करून कोरोनाचे नियम पाडून या विद्यार्थ्यांसाठी ,चिमूर क्रांती शहीद स्मृती दिनाचे औचित्य साधत १६ आगस्ट ला शाळा सुरू केली.
एरवी खंडाळा गावात सर्वत्र खेडणाऱ्या मुलांचं चित्र आकाशच्या या उपक्रमाने बदलून गेलं असून आता मुलांना अभ्यासाची शिस्त व सवय लागल्याने पालक समाधानी आहेत.