🎯सूरज ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे गोंडपिंपरी नगरपंचायत च्या सफ़ाई कर्मचार्यांना मिळाला न्याय
गेल्या एक महिन्यापासून युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांच्या माध्यमातुन गोंडपिंपरी मधील सफ़ाई कर्मचाऱ्यांचा तेथील प्रशासनाशी थकित वेतन तथा वेतन वाढ व पी. एफ. संदर्भात लढा सुरू होता या बाबत सूरज ठाकरे यांनी दिनांक 02/12/2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली होती व मोर्चा देखील काढला होता त्याची गांभीर्याने दखल उपजिल्हाधिकारी यांनी घेत कार्यवाही करीत कर्मचार्यांना त्यांचे पी. एफ. देण्याचे आदेश अधिकार्यांना दिले व अखेर सफाई कर्मचार्यांना त्यांचे पैसे मिळाले,
या मुळे परत एकदा युवा कामगार नेतृत्व सूरज ठाकरे यांच्या यशस्वी वाटचालीला आणखीन चालना भेटली आहे व सामन्यांचा विश्वास आणखीन बळकट झाला आहे,
*जो कोई ना करे वो ठाकरे करे*
असे घोषणाबाजी करत कामगारांनी सूरज ठाकरे यांचे आभार मानले व आजीवन त्यांचा सोबत जुळून समाजसेवेचे कार्य करण्याचे वचन दिले. या प्रसंगी युवा स्वाभिमानी पक्षाचे तालुका अध्यक्ष नागेश इटेकर , मोहब्बत खान,नदीम अली, राहुल चव्हाण, अजवान टाक, निखिल बजाइत,नितेश बेरड, रोशन हरदे, समीर देवगडे, स्वप्निल रामटेके, महेश ठाकरे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.