घोषित केलेले कन्हारगांव अभयारण्य रद्द करा!
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धिरज बांबोडे यांची मागणी
चंद्रपूर । बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपीपरी तालुक्यातील वनविकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील कन्हारगांव, झरण, धाबा, तोहोगाव वनक्षेत्राच्या 269 चौ.की.मी क्षेत्र अभयारण्य घोषित करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. आरक्षित अभयारण्य घोषित केल्यास तालुक्यातील ४२१४४ लोकांसख्या असलेली ३३ गावे बाधित होणार आहेत. त्यामुळे हे अभयारण्य रद्द करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव धिरज बांबोडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या परिसरात दररोज २७०० ते ३००० मजूर जंगलाच्या कामावर अवलंबून असतात. त्यामुळे या परिसरातील शेतकरी कष्टकरी व मजूर यांनाही रोजगारापासून वंचित राहावे लागणार आहे. तेव्हा राज्य शासनाने प्रस्तावित केलेले कन्हारगांव अभयारण्य प्रस्ताव तात्काळ रद्द करावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर परिसरातील गावातील नागरीकांना घेऊन धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा हि सदर निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव धीरज बांबोडे, प्रमोद भीमराव कातकर, गणेश वित्तल चाचाने, विश्वनात मंडल, हेमंत कुसराम, अमोल नुसरवर, सत्यवान जीवने, अरुण धकाते, ज्ञानेश्वर मरस्कोले, विनोद पोंनलवार, संदीप जाधव, उत्तम मंडल आदी नागरिक उपस्थित होते.