सदैव साथ देणारी जिवलग मैत्रिण गमावली -ऩगर सेविका छबूताई वैरागडे !
दिवंगत पाेर्णिमा बावणेला वाहिली अनेकांनी भावपूर्ण श्रध्दांजली !
🟨🟡चंद्रपूर🟢किरण घाटे🟣💠पाेर्णिमेच्या अनपेक्षित जाण्याने मला फार दुख:झाले असुन आपल्या आयुष्यातील एका प्राणप्रिय व जिवलग मैत्रिणीला मी आज मुकली आहे अश्या शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत चंद्रपूरच्या विद्यमान नगरसेविका तथा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रकमी राहणां-या जटपूरा वार्ड निवासी छबूताई वैरागडे यांनी दिवंगत पाेर्णिमा बावणेला आपली भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली .चंद्रपूरातील अनेक सामाजिक ,शैक्षणिक तदवतचं महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल महिला व्यासपीठाच्या सदस्या तथा मार्गदर्शिका पणू उर्फ पाेर्णिमा बावणे यांचे गेल्या दिड महिण्यापुर्वि दुखद निधन झाले हाेते .त्या गेल्या एक महिण्यांपासून आजारी हाेत्या .डाँक्टर मंडळीकडुन उपचार देखिल सुरु हाेते पण शेवटी नशिबाने त्यांना साथ दिली नाही.सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणां-या स्व .पाेर्णिमा बावणे यांच्या म्रूत्यूने सर्वांना दुख:झाले . एक शांत स्वभावाची तरुण सदस्या आम्हाला साेडुन गेली सामाजिक क्षेत्रात ही कधीही भरुन न निघणारी पाेकळी निर्माण झाली या शब्दात साहित्य क्षेत्रातील विदर्भातील जेष्ठ लेखिका तथा सहज सुचलच्या संयाेजिका मेघा धाेटे तसेच राजुरा याेग पतंजलीच्या साेशल मीडीयाच्या (प्रसिध्दी प्रमुख) मायाताई काेसरे यांनी आपली दिवंगत पाेर्णिमाला श्रध्दांजली अर्पित केली .🟩☀️🌺येथील स्थानिक आय. एम. हाँल येथे शनिवार दि. १२डिसेंबरला सामाजिक कार्यकर्त्या छबुताई वैरागडे यांनी एक श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित केला हाेता त्या कार्यक्रमात स्व.पाेर्णिमाला श्रध्दांजली अर्पित करण्यांसाठी राजेश साेलपान , डाँ .शर्मिला पाेतदार , डाँ .विद्या बांगडे , सविता काबडे , शितल गुरनुले , पुष्पा उराडे , अनुराधा हजारे , साक्षी कार्लेकर , प्रा .स्नेहल बांगडे , आरिफा शेख , पुजा पडाेळे , वैशाखी साखरकर , जगदीश नंदुरकर , स्मिता रेभनकर , सुषमा नगराळे , सुवर्णा लाेखंडे , रंजना माणुसमारे , सुवर्णा काबडे , कविता जुमडे , ू कल्पना शिंदे , शुभांगी डाेंगरवार , सिमा भसारकर व सर्व उत्कृष्ट महिला मंचचे पदाधिकारी व सदस्यगण हजर हाेते .