पोंभुर्णा तालुक्यात जागतिक अपंग दिन सप्ताहाचे आयोजन
पोंभुर्णा प्रतिनिधी:- समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत गट साधन केंद्र पंचायत समिती पोंभूर्णा तर्फे तालुक्यातील विविध शाळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम स्पर्धा उपक्रम राबवून जागतिक अपंग दिन सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन स्वागत करण्यात आले. दिव्यांगाविषयी असलेले गैरसमज, अंधश्रद्धा, दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे दिव्यांगाला मिळणाऱ्या सोयी-सुविधा शासनाचे उपक्रम इत्यादी विषयी व दिव्यांगाच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पोंभूर्णा, फुटाणा, राष्ट्रमाता विद्यालय देवाडा खुर्द, साईकृपा विद्यालय चिंतलधाबा येथे विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात चित्रकला, रांगोळी, संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धा विजेत्या व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले दिव्यांग सप्ताहाचे आयोजन गटशिक्षणाधिकारी बापूराव मडावी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले यशस्वीतेसाठी समावेशित शिक्षक तज्ञ संदीप लभाने ,हरडे,विशेष शिक्षक हेपटे, बोरकर, कुमारी हुमणे व सर्व साधन व्यक्ती यांनी सहकार्य केले.