चंद्रपूरच्या गाैण खनिज पथकाच्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी कारवाया !
रेती माफियांचे धाबे दणालेले ! शहरातील रेती तस्करांवर खनी कर्म विभागाचे लक्ष केन्द्रीत ?
🟣🟦चंद्रपूर 🟣🛑किरण घाटे🛑चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी रेती तस्करांनी वाहनांनी अवैध रेती नेण्यांचा व विकण्यांचा सपाटा सुरु केला हाेता .🟨🛑🟣🟨दिवस रात्र वाहनांने रेतीची वाहतुक हाेत असल्याचे तक्रारी दिवसांगणिक वरिष्ठ अधिका-यांकडे हाेवू लागल्या हाेत्या .उपरोक्त वाढत्या जनतेच्या तक्रारी लक्षात घेता चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अजय गुल्हाने , अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर व खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील गाैण खनिज पथकातील खनिज निरीक्षक बंडु वरखडे , दिलीप माेडक , व अल्का खेडकर यांनी शनिवार दि. १२डिसेंबरला सकाळ पासून तर रात्री उशिरा पर्यंत गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक अवैध रेती वाहनांवर कारवाया केल्याचे व्रूत्त आहे साेबतच वराेरा तालुक्यातील पिंपळगांव सिंगरु येथील एक पाेकलँन मशिन जप्त करुन ती पटवारी यांचे सुपुर्द नाम्यावर ठेवण्यांत आल्याचे विश्वासनिय सुत्राने या प्रतिनिधीस सांगितले .दरम्यान शहरातील पठाणपूरा मार्गावरील माना टेकडी परिसरात अवैध रेतीचे दाेन हाँफटन , स्थानिक अभियांत्रिक महाविद्यालया जवळ रेतीचा एक हायवा विसापुर व बल्हारपूर येथे प्रत्येकी एक रेतीचे टँक्टर वराेरा तालुक्यात मातीचे एक टँक्टर तसेच पिंपळगांव
येथे एक पाेकलँन मशिन अवैध गाैण खनिज उत्खनन करतांना पकडण्यांत आली असल्याचे खनिकर्म विभागाचे पथकातील बंडु वरखडे यांनी या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनी वरुन बाेलतांना सांगितले .🌀🛑🟣🟨नियमाप्रमाणे या सर्व जप्त करण्यांत आलेल्या वाहन मालकांवर दंडात्मक कारवाया करण्यांत आल्या असुन काहीनी दंडाची रक्कम भरली असल्याचे समजते .यातील काही अवैध रेतीचे वाहने तालुकास्तरावरील तहसील कार्यालयात दंडात्मक कारवायांसाठी जमा करण्यांत आल्याचे चाैकशीअंती कळले .या खनिकर्म विभागाच्या दणक्यामुळे जिल्ह्यातील अवैध गाैण खनिज तस्करांत एकच खळबळ उडाली असुन अक्षरशा त्यांचे धाबे दणाणले आहे. 🛑🟣🌀चंद्रपूरातील अवैध रेती तस्कारांचे केंद्र असलेल्या पठाणपूरा व बिनबागेट परिसराकडे गाैण खनिज पथकाने अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे खात्रीलायक व्रूत्त आहे