चिमूर तालुका राका मजबूत करण्यासाठी जनतेनी सामील व्हावे .. सुरेश रामगुंडे

0
627

चिमूर तालुका राका मजबूत करण्यासाठी जनतेनी सामील व्हावे .. सुरेश रामगुंडे

*राकापा संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवस निमित्त कार्यक्रम* .

चिमूर
पश्चिम महाराष्ट्रात शरदचंद्र पवार साहेबच मोठं नाव आहे तरुणाला लाजवेल अशी महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सरकार बनवून दिले नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदार संघात सुद्धा भाजप ला घरचा आहेर देत महाविकास आघाडी चे उमेदवार निवडून आणले असून पुढील काळात चिमूर नप निवडणूक मध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी करण्यासाठी राकात जनतेनी सहभागी होण्याचे आवाहन सुरेश रामगुंडे यांनी केले .

राकापा संस्थापक अध्यक्ष ,खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवस निमित्त च्या हुतात्मा स्मारक मधील कार्यक्रमात अध्यक्षस्थानी निरंजन शेंडे तर उद्घाटक राका किसान सभा जिल्हा अध्यक्ष तथा राका ओबीसी प्रदेश सरचिटणीस सुरेश रामगुंडे, माजी जीप सदस्य विलास डांगे, राका जेष्ठ नेते सुनील मैद ,तालुका अध्यक्ष योगेश ठुने , महिला तालुका अध्यक्ष प्रिंयका बहादूरे, अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्ष जावेद पठाण , रायुका तालुका अध्यक्ष अजय चौधरी, रमेश खेरे अनंता कामडी ,नरेंद्र दडमल महंमद शेख ,रामू चौधरी आदि उपस्थित होते.
दरम्यान राका संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून साजरा करण्यात आले

यावेळी *माजी जीप सदस्य विलास डांगे* म्हणाले की १२ डिसेंबर हा दिवस दोन राष्ट्रीय नेत्यांचा वाढदिवस असल्याचे सांगत देशाचे नेतृव करणारे शरदचंद्र पवार असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार आहे .तसेच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा सुद्धा वाढदिवस असल्याने अत्यंत दमदार नेतृव असल्याने दोन ही नेत्यांची देशासाठी ,राज्यासाठी आवश्यकता असल्याचे सांगितले .

सुनील मैद म्हणाले की जाणता राजा म्हणजे शरद पवार असून महाविकास आघाडी चे शिल्पकार आहे . राज्यात पवार साहेबांचा वाढदिवस साजरा होत असताना
देशाचे नेते आणि पक्षाचे आधारस्तंभ असल्याने पक्ष मजबूत करण्याचे सांगितले

संचालन राका तालुका कार्याध्यक्ष राजू मुरकुटे यांनी केले
तालुक्यातील राका ची कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here