यवतमाळ जिल्हा
- आर्णीः
आर्णी येथे मागील तीन महिण्यापासुन बीएसएनएलची सेवा ठप्प आहे त्याचा फटका नागरिक व खाजगी तसेच शासकीय कार्यालयांना बसला आहे येथील पोस्ट कार्यालय, बॅकेतील इंटरनेट सेवा बंद असल्याने खातेदारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे या संदर्भात आमचे प्रातिनिधि समीर मलनस हे बीएसएनएलच्या ऑफीसला विचारणा करायला गेले असता त्यांना ऑफीसला लाॅक लावुन असल्याचे निदर्शनास आले अशा परिस्थितीत तक्रार कोणाकडे करायचे असा सवाल येत आहे आर्णी हे जिल्ह्यातील मोठा तालुका म्हणुन ओळखल्या जाते आर्णीला 110 खेडे जोडले आहे आर्णीला एक मोठे ऑफिस आहे परंतु येथील कर्मचारी व अधिकारी यांच्या कडे तक्रार करायला गेल्यास त्या ग्राहकाची निवारण न करता त्याला यवतमाळ येथे पाठवण्यात येते तर आर्णीतील कर्मचारी व अधिकारी शासनाकडून पगार कशाचा घेतो बीएसएनएल ने ही अडचन तत्काळ सोडवावी अशी मागणी जनतेकडुन होत आहे बीएसएनएलची सेवा ठप्प झाल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमधुन संताप व्यक्त केला जात आहे.