समिर मलनस(यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव व कोरोना विषाणुच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी यवतमाळ, पांढरकवडा, नेर व दारव्हा शहरात व या शहरालगतच्या भागात दिनांक 24 जुलै च्या मध्यरात्रीपासून ते 31 जुलै 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यवतमाळ, पांढरवकडा, नेर आणि दारव्हा आणि या शहराच्या लगतच्या परिसरात 25 जुलै पासून संचारबंदी लागू होत असल्याने नागरिकांच्या सुविधेसाठी उद्या दिनांक 24 जुलै रोजी (एकच दिवस) दुकाणे उघडी ठेवण्याची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत राहणार आहे.