प्रतिनिधी/राजू झाडे
शेतातून घराकडे बैल घेऊन येणाऱ्या कविटपेठ येथील एका व्यक्तीवर वाघाने हल्ला केला. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. या हल्ल्यात सदर इसम गंभीररीत्या जखमी झाला आहे. जखमीचे नाव तुळशीराम आत्राम ( वय अंदाजे 70 वर्ष ) आहे. वन विभागाने घटनेची माहिती होताच घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मागील काही दिवसापासून गावालगत जंगल असल्यामुळे वाघ नेहमी गावाच्या शेतशिववारात आढळून येत होता. अनेकांनी त्या वाघाला डोळ्याने बघितल्याचे चर्चेत होते. मात्र आता या वाघाने आज संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास गावातील एका व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात सदर इसम गंभीर जखमी झाला आहे. सदर व्यक्ती नियमितप्रमाणे आपल्या शेतातून घराकडे संध्याकाळचे 5 वाजता रस्त्याने बैल घेऊन घराकडे येत होता. दबा धरून बसलेल्या वाघाने मागून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात व्यक्ती गंभीरपणे जखमी झाला आहे. कसाबसा त्याचा जीव वाचला. यामुळे गावाकाठी येऊन माणसांवर हल्ला करतील तर गावकऱ्यांचे काय होणार? असा प्रश्न ग्रामस्थांच्या चर्चेत आहे. जंगलालगत शेती असल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या बाबीवर वनविभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे. ताबडतोड सदर वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.