ट्रक मधून घेऊन जाणाऱ्या १५ जनावरांना दिलं जीवनदान
चामोर्शी पोलीस प्रशासनाची उत्तम कामगिरी
चामोर्शी (प्रतिनिधी):- कत्तलीसाठी जनावरांची तस्करीच्या गुप्त माहिती वरून चामोर्शी पोलीसांनी स्थानिक पंचायत समिती मार्गावर सापळा रचून ट्रक जनावरसह ताब्यात घेतला. या प्रकरणी तिन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रायपूर वरून हैदराबाद कडे जाणाऱ्या टिळक १२ युती ९४७०क्रमांकाचा ट्रक पोलीसांनी नाकाबंदी करून अडविला त्यानंतर ट्रक ची तपासणी केली असता १५ जनावरे कत्तलीसाठी कोंबून नेत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक रवी नागेधर (२४) मोहम्मद नईमूद्दीन (३८) सय्यद जाव्वेदअली(३८) तिघेही राहणार तेलंगणा आदींना अटक करून त्यांच्या वर महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१नुसार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला पकडलेली सर्व जनावरे श्रीकृष्ण गोशाळा व सेवा समिती गोंडपिपरी येथे संगोपनासाठी पाठविण्यात आली आहे. सदर कारवाई प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार राजु उराडे, चंद्रशेखर गम्पलवार अन्य पोलीस कर्मचारी तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार राजेश गणविर करीत आहेत.