महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून राजुरा येथे अमोल राऊत यानी केले रक्तदान शिबिराचे आयोजन!
वडिलांना दिली आगळीवेगळी भावपुर्ण आदरांजली!
नागवंश युथ फोर्स राजुराच्या टीमचे अमूल्य सहकार्य!
राजु झाडे
राजुरा:- दि.6-12-2020 रोजी रविवारला विश्वरत्न, ज्ञानाचा अथांग सागर, परमपूज्य, घटनाकार, बौध्दीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ मानण्यात येणाऱ्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नेहमी कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून चर्चेत असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अमोलभाऊ राऊत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून कालकथित सेवानिवृत्त तलाठी तसेच सामाजिक कार्यकर्ते सदाशिव संभाजी राऊत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भावपूर्ण आदरांजली म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाला रक्तदात्यांनी मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शवली असुन जिल्हा रुग्णालय चंद्रपूरच्या चमू डॉ. लहू कुळमेथे, जय पचारे, सौ वर्षा सोनटक्के, विशाल बानकर, देवेंद्र कुडवे, अमित वाकोडे यांनी सहकार्य केले. तसेच नागवंश युथ फोर्स राजुराचे कार्यकर्ते धनराज उमरे, अमोलभाऊ राऊत, राहुल अंबादे, रविकिरण बावणे, नूतन ब्राह्मणे, सुरेंद्र फुसटे, रवि झाडे, सौरभ करमनकर, विजय कांबळे, आकाश नळे, उत्कर्ष गायकवाड,, निखिल वनकर, आशिष करमरकर, प्रसन्ना मनवर, हर्षल गाले, स्वप्नील गाले, संयोग साळवे, अनिकेत साळवे, आकाश कोडपे आणि नागवंश युथ फोर्स राजुराच्या संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले असून जेष्ठ पत्रकार उमाकांत धोटे व चरणदास नगराळे यांचे मोलाचे योगदान लाभले.एकूण 56 रक्तदात्यांनी रक्तदान करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमोलभाऊ राऊत यांनी रूढी परंपरेने भोजनदान यासारखे कार्यक्रम न करता रक्तदान शिबिरासारखा कार्यक्रम राबवून स्वतःच्या वडिलांना भावपूर्ण आदरांजली वाहून समाजाला एक उत्कृष्ट प्रेरणा देण्याचे काम केले. देशात सध्यास्थितीत चालू असलेल्या covid-19 प्रादुर्भाव लक्ष्यात घेता त्यांनी रक्तदानाचे महत्त्व जाणून या कार्यक्रमाचे आयोजन केले असून समाजापुढे रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्याचे मोलाचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.