दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले निवेदन
मूल प्रतिनिधी
केंद्र सरकार कडून संसदेत शेती विधेयक पारित केल्यापासून संपूर्ण देशात तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत केद्र सरकार कडून या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आता देशातील शेतकरी संघटना
राष्ट्रीय पातळीवर दिल्ली मध्ये आंदोलन करण्यासाठी जात आहेत. यांच्या
मागण्या शेतकरी हिताच्या असून केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी विधेयक
मागे घेण्यासाठी आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टी मूल तालुका या आंदोलनात पूर्णपणे सहभागी आहे. असे निवेदन आम आदमी पार्टी मूल तालुका अध्यक्ष अमित राऊत यांचे नेतृत्वात नायब तहसिलदार साधनकर यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले.
केंद्र सरकारने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक
घेवून सकारात्मक निर्णय घेवून शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करावेत आणि
विविध ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केसेस लावण्यात आल्यात त्या
मागे घ्याव्यात. अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदन देतांना आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष अमित राऊत, संघटक प्रकाश चलाख, प्रसिद्ध्ी प्रमुख अभि भिमनवार, सचिन वाकडे,पियुश रामटेके, शेतकरी गुरूदास गोहणे, आदी उपस्थित होते.