नागपूर विभाग पदवी मतदार संघाचे मतदान शांततेत !

0
763

नागपूर विभाग पदवी मतदार संघाचे मतदान शांततेत !

मतदारांत दिसला अमाप उत्साह!चंद्रपूर जिल्ह्यात ६७:४७ टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क !

चंद्रपूर🟡🟥किरण घाटे 🔵🟥 मंगळवार दि.१डिसेबरला सकाळी ८ते सांयकाळी ५वाजे पर्यंत नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीचे मतदान पार पडले .चंद्रपूर जिल्यातील एकुण ५०केन्द्रावर जावून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला .या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात ६७:४७ टक्के मतदान झाल्याचे व्रूत्त सायंकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्राप्त झाले .अत्यंत शांतमय पध्दतीने पार पडलेल्या निवडणुकीत एकंदर १९उमेदवार आपले भाग्य अजमविण्यासाठी निवडणुक मैदानात उतरले हाेते .जिल्ह्यात सकाळपासूनच उमेदवारांसह मतदारांत उत्साह दिसून आला चंद्रपूरातील १३मतदार केन्द्रावर कुठलीही अप्रिय घटना न घडता मतदान सुरळीत पार पडले .🟤🟧🔵मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील पन्नास ही मतदार केन्द्रे परिसरात फाैजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम १४४लागू करण्यांत आली हाेती . 🔸🔶🔹१००मिटर परिसरात मतदार शिवाय अन्य लाेकांचा जमाव हाेवू नये या साठी ही कलम जिल्हा प्रशासनाच्या वतीने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ३०नाेव्हेंबर ते १डिसेंबर दरम्यान लागू केली हाेती .तसे आदेशही जारी केले हाेते .🟥🛑🟡 चंद्रपूर जिल्ह्यात ५०मतदान केन्द्रासाठी २४०कर्मचा-यांची नियुक्ती करण्यांत आली हाेती.🟤🟧🟢🔷या शिवाय प्रत्येक मतदान केन्द्रावर महाभयानक काेराेनाचे संकट बघता साबन , साँनिटायझर पीपीई किट आदि आवश्यक सामुग्री उपलब्ध करुन देण्यांत आली हाेती .मतदान शांततेत पार पाडण्यांसाठी प्रत्येक मतदान केन्द्रावर चाैख पाेलिस बंदोबस्त व फिरते पाेलिस पथक तैनात करण्यांत आले हाेते.वैद्यकिय चमु देखिल मतदान केन्द्रावर प्रामुख्याने दिसुन आली .निवडणुक प्रक्रिया पूर्णपणे व्यवस्थित पार पाडण्यांसाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचेसह इत्तर वरिष्ठ अधिका-यांनी या कडे विशेष लक्ष दिले हाेते .तर निवडणुक रिंगणातील उमेदवारांचे व जिल्ह्यातील इत्तर दिग्गज नेत्यांचे लक्ष या निवडणुकी कडे लागले हाेते .प्रत्येक केन्द्रावरील मतदान आकडेवारी व टक्केवारी ते घेत असल्याचे या वेळी प्रत्यक्षात दिसून आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here