गडचांदूरात रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांची 30 नोव्हेंबरला आढावा बैठक !
प्रहार सेवकांना उपस्थित राहण्याचे आवाहन !
किरण घाटे
गडचांदूर :-येत्या 30नाेव्हेंबरला चंद्रपूर प्रहार पक्षाची जिल्ह्यातील कोरपना व जिवती तालुक्यातील आढावा बैठक ठेवण्यात आली आहे.या बैठकीला विदर्भ प्रमुख व नवनियुक्त जिल्हा संपर्क प्रमुख रुग्ण मित्र गजुभाऊ कुबडे उपस्थित राहणार आहे .तदवतचं
नामदार बच्चूभाऊ कडू (शालेय शिक्षण,कामगार, जलसंपदा, महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री महाराष्ट्र् राज्य) यांच्या आदेशानुसार पक्ष बांधणी व पक्ष विस्तारा संदर्भात विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांना चंद्रपूर गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने गजुभाऊ कुबडे यांनी जिल्ह्याचा आढावा घेत तालुका निहाय बैठक (तीन दिवसीय दौऱ्यात) आयोजित केल्या आहे . 28 नोव्हेंबरला चिमुर ,सिंदेवाही नागभीड येथील दौरा यशस्वीपणे पार पडला यात असंख्य युवक व शेतक-यांनी प्रहार मध्ये (सेवा बंधन बांधून ) प्रवेश केला. यातच अनेक राजकीय पक्षांना खिंडार पडले असुन कुबडे याना जिल्हा संपर्क प्रमुख पद मिळाल्याने कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे जोमाने पक्ष वाढीसाठी कामाला लागायचे आहे असा सल्ला कुबडे हे कार्यकर्त्यांना देत आहे .29 नोव्हेंबरला चंद्रपुर, बल्लारपूर या ठिकाणी आढावा बैठक संपन्न झाली या वेळी असंख्य महिला युवक व शेतकरी वर्गांची प्रामुख्याने उपस्थिती होती प्रहार पक्षात प्रवेश करण्याऱ्या कार्यकर्त्यांना प्रवेश घेण्यात आला. 30 तारखेला गडचांदूर येथे कोरपना, जिवती तालुक्याची आढावा बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रम हाेत आहे
राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचा आदर्श डोळ्यां समोर ठेवून युवक शेतकरी ,महिला वर्गानी प्रहार मध्ये येऊन समाजकारणा साठी सेवा बंधन बांधून प्रेवंश करावा असे आवाहन सतिश बिडकर ,शैलेश विरुटकर पंकज माणूसमारे सागर गुड्डेलीवर, गणेश ठावरी जीवन तोगरे, अफरोज अली, पारस सांगोळे इसाक बेग विजय बानकर यांनी केले आहे .