पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी बहुजन चेहरा सभागृहात पाठवा : ना. वडेट्टीवार
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
गडचांदूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पिरिपा कवाडे गट रिपाई गवई गट आणि सर्व मित्र पक्षांच्या वतीने महाविकासआघाडी ने शिक्षण क्षेत्रातील जाण असणारा तरुण चेहरा ऍड.अभिजित वंजारी नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाच्या महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून दिला आहे. पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी महाविकासआघाडी आघाडीने दिलेल्या बहुजन चेहऱ्यास विधानपरिषदेत पाठविण्याचेआवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
गडचांदूर येथे कोरपना व जिवती तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित प्रचार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार बाळु धानोरकर, आमदार सुभाष धोटे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर चापले, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष दुष्यंत निमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्रीधर गोडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, पंचायत समिती सभापती रूपाली तोडासे, नगराध्यक्ष सविता टेकाम, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, गणपत आडे, रंजन लांडे,माजी सभापती नोगराज मंगरूळ कर, प्राचार्य डॉ. शशिकांत आस्वले, विजुक्टाचे प्रा. धनंजय काळे, महाराष्ट्र पदवीधर डी.एड.माध्यमिक महासंघाचे बंडू धोटे, आश्रम शाळा शिक्षक महासंघाचे अशोक बावणे, प्राचार्य अनिल मुसळे, धनंजय गोरे, उपमुख्याध्यापिका स्मिता चिताडे, डॉ. हेमचंद दूधगवळी, डॉ. शरद बेलोरकर, नगरपरिषदेचे गटनेता विक्रम येरणे, सभापती जयश्री ताकसांडे, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम, अर्चना वांढरे, पापय्या पोन्नमवार,व्यापारी संघाचे अध्यक्ष हंसराज चौधरी, शहराध्यक्ष संतोष महाडोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीच्या वतीने जुनी पेन्शन योजना व विनाअनुदानित शाळांचा प्रश्न यावर सुद्धा विधानभवनात चर्चा करून ठोस निर्णय घेणार असल्याचे सांगितले. हे सरकार पूर्ण ताकiतीने पाच वर्षे चालणार असेही ते यावेळी म्हणाले. खासदार बाळू धानोरकर यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर कडाडून टीका केली गेल्या 42 वर्षांपासून पदवीधरांचे नेतृत्व करणाऱ्यांचा चांगलाच समाचार त्यांनी घेतला. पदवीधरांच्या नावावर राजकारणात मोठे होऊन केंद्रीय राजकारणापर्यंत पोहोचल्यानंतरही अनेक विरोधी नेत्यांनी पदवीधरांच्या समस्या मात्र सोडवल्या नाही असा आरोप त्यांनी केला. आमदार सुभाष धोटे यांनी बोलताना म्हटले की, राजुरा विधानसभा क्षेत्र काँग्रेस विचारसरणीचा गड राहिला आहे. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य असते. यावेळी मात्र पूर्वीपेक्षाही जास्त मताधिक्य मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष देवकर यांनी केले प्रास्ताविक प्रा. डॉ. संजय गोरे यांनी केले तर आभार युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सतीश बेतावर, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन बावणे, मिलिंद ताकसांडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रुपेश चुधरी, उपाध्यक्ष अतुल गोरे, आशिष वांढरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजुरकर, मकसूद सय्यद, प्रितम सातपुते, उदय काकडे, लोकेश कोडापे आदींनी सहकार्य केले.