मॅजिक बस इंडिया फौंडेशनच्या वतीने कोरपना तालुक्यातील आवालपूर येथे माझी शाळा – माझी सुरक्षा उपक्रम
कोरपना : मॅझिक बस इंडिया फौंडेशन संस्था चंद्रपूरचे वरिष्ठ जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रशांत लोखंडे व तालुका समन्वयक सुपडा वानखडे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात स्केल कार्यक्रमा अंतर्गत राजुरा तालुक्यातील गावा-गावात वर्ग ६ वी ते वर्ग ९ वी च्या विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून जीवन कौशल्य वाढविणे उपक्रम चालू झालेला असून, बालक दिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत माझी शाळा माझी सुरक्षा हा उपक्रम घेण्यात येत आहे. त्याचनुसार दिनांक 24 नोव्हेंबर 2020 रोजी आवाळपूर येथे हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये कोविड19 च्या आपत्ती परिस्तिथीत शाळा पूर्णतः बंद आहेत परंतु अश्या परिस्थिती त शाळा सुरू झाल्यास आम्ही मूल म्हणून स्वतःची ची सुरक्षा काय असली पाहिजे , मी स्वतः कुठली काळजी घेतली पाहिजे यावर मुलांनी चित्रांद्वारे आपले मत व्यक्त केलेत व या स्पर्धेत अनेक मुलांनी सहभाग दर्शविला तसेच पालकवर्ग व शिक्षकवृंद यांचे सुद्धा मत जाणून घेण्यात आले हे उपक्रम घेत असताना शासनाने दिलेल्या दिशा निर्देशाचे योग्य पालन करून उपक्रम पार पडला आहे. सदर कार्यक्रमा प्रसंगी त.मु.स. अध्यक्ष मा. काकडे सर , जी. प.प्राथ शाळा आवलापूर मुख्याध्यापक मा. उपरे सर , चांदेकर सर ,अंगणवाडी सेविका व पालकवर्ग , समुदाय संघटक माधुरी धोटे व शाळा सहायक अधिकारी भूषण शेंडे उपस्थित होते.