चंद्रपूरात निघाला ओबीसी बांधवांचा विशाल माेर्चा ! पाेलिस प्रशासनाचा तगडा पाेलिस बंदोबस्त ! ठिकठिकाणी माेर्चेकरांचे झाले स्वागत ! बाजारपेठेत दिसली नाही आज ग्राहकांची गर्दी !
किरण घाटे
चंद्रपूर:- अख्ख्या विदर्भात बँल्क गोल्ड सिटी म्हणुन ओळख असणां-या चंद्रपूर नगरीत आज गुरुवार दि.२६नाेव्हेंबरला संविधान दिनी ओबीसी जनगणना समन्वय समितीचे वतीने सकाळी ११वाजता महामाेर्चाचे आयोजन करण्यात आले हाेते .आयाेजित हा भव्य मोर्चा डाँ .बाबासाहेब आंबेडकर काँलेज दिक्षाभुमी चंद्रपूर येथुन निघाला . विशेष म्हणजे आज पावेताे चंद्रपूरात या अगाेदर जे काही विविध मांगण्या संदर्भात मोर्चे निघाले त्यापेक्षाही हा सर्वात माेठा माेर्चा हाेता .अर्थातच या माेर्चाने अक्षरशा चंद्रपूरकरांचे लक्ष वेधुन घेतले हाेते .
रस्त्यांच्या दुर्फा बघ्यांची गर्दी आज प्रत्यक्षात दिसून आली .सन २०२१च्या जनगणनेत आेबीसीची जनगणना करा , उच्च शिक्षणामध्ये आेबीसीना २७टक्के आरक्षण द्या , आेबीसी विद्यार्थांना एस .सी. एसटी विद्यार्थ्यांना प्रमाणे शंभर टक्के स्काँरशिप देण्यांत यावी , सरकारने नाेकरभरती त्वरीत उठवावी ,आरक्षणचा अमल न करणां-या अधिका-यांवर फैजदारी कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसह इत्तर अनेक मागण्यांसाठी आेबीसीचा मोर्चा चंद्रपूरच्या मुख्य मार्गावरुन निघुन ताे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
विविध घोषणा देत निघालेल्या माेर्चाचे ठिकठिकाणी जनतेनी उत्स्फुर्त स्वागत केले दरम्यान येथील स्थानिक गांधी चाैकातील महानगर पालिके जवळ यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने माेर्चेकरांसाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यांत आली हाेती .शांतता ,कायदा व व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यांच्या द्रूष्टीकाेणातुन शहरातील ठिकठिकाणच्या मुख्य चाैकात तगडा पाेलिस बंदोबस्त ठेवण्यांत आला हाेता.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील आेबीसी बांधव स्वयं स्फुर्तीने माेर्चात सहभागी झाल्याचे चित्र आज प्रत्यक्षात दिसुन आले अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने निघालेला माेर्चा हा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला व ताे शांततेत पार पडला.
चंद्रपूरातील आयाेजित या माेर्चामुळे संपूर्ण बाजार पेठत एरव्ही दिसणारी ग्राहकांची गर्दी आज म्हणावी तशी दिसुन आली नाही .पार पडलेल्या या माेर्चात दिव्यांग्यांनीही आपला सहभाग नाेंदिविला हाेता .चंद्रपूर पाेलिस विभागाच्या वतीने माेर्चाच्या पाश्वभुमीवर नागरिकांसाठी रस्ता वाहतुकीत काहीसा बदल केला हाेता.