आदर्श हायस्कूल येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा.
– राष्ट्रीय हरित सेने तर्फे राबविले स्वच्छता अभियान.
– विध्यार्थीनी केले भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन.
राजुरा 26 नोव्हेंबर | राजुरा
बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना विभागा मार्फत सामाजिक वनीकरण विभाग राजुरा चे वनपरीक्षेत्र अधिकारी यू.एम. जंगम व राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या मार्गदर्शनात संविधान दीना नीमीत्य भारताचे संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन व शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवीन्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर यांची उपस्थिति होती. तर प्रमुख अतिथि म्हणून आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे यांची उपस्थिति होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संविधान निर्माते ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित विध्यार्थीनी भारताचे संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. संविधानात नमूद मूल्ये ,मूलभूत कर्तव्य, वैशिष्टय यावर मुख्याध्यापक जांभूळकर यांनी आपले विचार व्यक्त करीत विध्यार्थीना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता अभियान राबवीन्यात आले. यावेळी शाळेच्या परिसरातिल कचरा गोळा करून प्लास्टिक चा कचरा नगर परिषदेच्या स्वाधीन करण्यात आला. तर कागदी कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता व्ही.एम. कुंदोजवार ,वनपाल सामाजिक वनीकरन विभाग राजुरा यांच्या सह राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या विध्यार्थीनी श्रुती योगेश रायपूरे , वेदांती परशुराम गर्गेलवार , गौरी बंडू धोटे अथक परिश्रम घेतले. कार्यक्रामाची सांगता मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रधांजलि वाहून करण्यात आली.