ओबीसी बांधवाच्या बाईक रॅलीने वरोरा शहर दुमदुमले
खासदार बाळू धानोरकर यांनी चालवली दुचाकी
वरोरा : ओबीसीची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे याकरिता संविधान दिनी चंद्रपूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या जनजागृतीकरिता वरोरा शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बाईक रॅलीने वरोरा शहर दुमदुमले.
वरोरा शहरातील विश्रामगृहा नजीकच्या रस्त्यावरून बाईक रॅलीला प्रारंभ करण्यात आला. खासदार बाळू धानोरकर हे स्वतः दुचाकी चालवीत रॅलीमध्ये सहभागी झाले होते. बाईक रॅली आनंदवन चौक, रेल्वे स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मत्ते रुग्णालय, नेहरू चौक, चिकन मार्केट, साई मंगल कार्यालय- कामगार चौक, मिलन चौक, फिल्टर टॅंक तुळाना रोड, जुनी पाणी टाकी, माढेळी रोड – खेमराज कुरेकार – राजीव गांधी चौक – बँक ऑफ महाराष्ट्रा, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, डोंगरवार चौक त्यानंतर महात्मा गांधी चौकात समारोप करण्यात आला. यावेळी नगरसेवक ऍड. प्रदीप बुराण, तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर यांनी उपस्थितांना २६ नोंव्हेबर रोजी चंद्रपूर येथील मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर यांनी समाजातील कुठल्याही जातीतील घटकावर झालेला अन्याय सहन करणार नाही. जनतेला कुठलाही प्रश्न असो त्याकरिता सभागृहात पोटतिलकीने मांडू, तिथे न्याय मिळाला नाहीतर वेळप्रसंगी अन्यायग्रस्तांसोबत रस्त्यावर उतरण्याकरिता मागे बघणार नाही असे प्रतिपादन केले. २६ नोव्हेंबर रोजी आयोजित चंद्रपूर येथील मोर्चामध्ये सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्क्रमाचे संचालन बाजार समिती सभापती राजू चिकटे व नागसेवक छोटू शेख यांनी केले. बाईक रॅलीमध्ये सर्वच समाजातील युवक, युवती, पुरुष व महिला मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या.