धक्कादायक!!! स्वतंत्र भारतातली निंदनीय घटना

0
987

धक्कादायक!!! स्वतंत्र भारतातली निंदनीय घटना

अनुसूचित जाती-जमाती समुदायाच्या लोकांचे केस कापले म्हणून न्हावीसह कुटुंबावर समाजिक बहिष्कार

Impact24news Team

विविध ग्रामीण भागात सलूनमध्ये जातीय भेदभावाच्या घटना समोर येत आहेत. ज्यामुळे न्हावी अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांचे केस कापणे आणि शेव्हिंग करण्यास नकार देतात. अशीच एक घटना कर्नाटकातील म्हैसूरमध्ये घडली आहे.

सविस्तर प्रकरण जाणून घ्या…

सदर घटना कर्नाटकातील नानजनगुगु भागातील हल्लारे गावातील आहे.

व्यवसायाने न्हावी असलेले मल्लिकार्जुन शेट्टी यांनी अनुसूचित जाती-जमाती समुदायाच्या लोकांचे केस कापले म्हणून त्याच्यासाहित कुटुंबाचा स्थानिकांनी सामाजिक बहिष्कार टाकला आहे. तसेच गावकऱ्यांनी त्यास ५० हजार इतका दंडही ठोठावला आहे.

यापूर्वीदेखील अनेकवेळा त्याच्यावर इतका मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच यापूर्वी दोन वेळा दंडही भरला आहे.

त्याने एससी आणि एसटी समुदायातील लोकांचे केस कापले आणि दाढी केली त्यामुळे त्याला धमकीही दिली जात आहे.

मल्लिकार्जुन यांची आत्महत्येची धमकी : न्हाव्याने सांगितले की, त्याने याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्याच्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका आहे.

अधिकाऱ्यांनी त्यांची मदत केली नाही तर ते कुटुंबासह आत्महत्या करतील.

त्यांच्याकडे दंडाची रक्कम भरण्याचे पैसेही नाहीत. आणि सामाजिक बहिष्कार सहन करण्याची क्षमताही नाही असे ते म्हणाले.

कर्नाटकमध्ये सरकारी सलून सुरू करण्याचा प्रस्ताव : एससी आणि एसटी समुदायातील लोकांचे केस कापण्यासाठी समाज कल्याण विभागाने कर्नाटकमध्ये सरकारी सलून सुरू करण्याची शिफारस केली आहे.

हा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली एससी-एसटी अत्याचार अधिनियमावर समीक्षा बैठकीदरम्यान सादर केला गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार समाज कल्याण विभाग यासाठी आवश्यक निधी मंजुर करणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, केरळ सरकारनेही राज्यात सरकारी सलून सुरू केले आहेत.

ग्रामीण भागात सुरू केलेल्या या सलूनमध्ये एससी आणि एसटी समुदायातील लोक आपले केस कापू शकतात आणि दाढीही करू शकतात.

परंतु हि जातीपातीची दरी मिटवण्यासाठी कोणत्या ठाम उपाययोजना करता येतील याचा मात्र कोणाकडेही इलाज नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here