वीज बिल माफ करण्यासाठी भाजपने दिले मुख्यमंत्री यांना निवेदन, वीज बिलाची केली होळी
आशिष गजभिये
चिमूर – राज्यातील महाविकास आघाडी शासनाने कोरोना काळातील वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भाजप ने मागणी उचलून धरली होती तेव्हा राज्य शासनाने वीज बिल माफ करण्याचा शब्द दिलेला होता परंतु आज पर्यत वीज बिल माफ केले नसल्याने राज्य भर वीज बिल होळी आंदोलन केले असता चिमूर तालुक्यात भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ श्यामजी हटवादे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तहसीलदार मार्फ निवेदन देण्यात आले . वीज बिल होळी आंदोलन प्रसंगी जीप उपाध्यक्ष रेखाताई कारेकर , निलम राचलवार जीप सदस्य मनोज मामीडवार पस सदस्य अजहर शेख समीर राचलवार , पस सदस्य प्रदीप कामडी टीमु बलडवा , कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कलिम शेख विनोद चोखरे नगरसेवक सतीश जाधव संजय कुंभारे गुलाबराव फरकाडे मायाताई ननावरे , महादेव कोकोडे, बाबा ननावरे, प्रशांनत चिडे प्रफुल कोलते नितीन गभणे संदीप पिसे नप गट नेत्या छायाताई कनचलवार मनीषा कावरे अलका बोरतवार , नगरसेविका भारती गोडे प्रशांत चिडे अफरोज पठाण गोपाल बलदवा विजय झाडे प्रदीप लोणकर संजय नवघडे मनीष नाईक अशोक कामडी श्रेयस लाखे सुरज नरुले हरीश पिसे राजू बोडणे अरुण लोहकरे विकी कोरेकर गणेश मेहरकुरे गोलू भरडकर अमित जुमडे एकनाथ गोंगले लीलाधर बनसोड वामन सालेकार शलेंद्र पाटील अजय शीरभैय्ये आदी उपस्थित होते .यावेळी भाजप प्रदेश सदस्य डॉ श्यामजी हटवादे म्हणाले की महाविकास आघाडी सरकारने १०० युनिट पर्यत वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते परंतु आज पर्यत माफ केले नाही तर मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी माफ करणार नसल्याचे सांगितल्याने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला एकदा सरकार बसविताना विश्वास घात केला जनतेची लोकोपयोगी कामे करन्याचे आश्वासन दिले होते परंतु आता दिलेले अशा आश्वासन पूर्ण न करता जनतेचा विश्वासघात केला म्हणून तिघाडी शासनाचा निषेध करीत अन्यथा वीज बिल माफ करण्यासाठी भाजप सतत संघर्ष करणार असल्याचे सांगितले.