गडचांदूर पोलीसांनी लावला १०तासात बेपत्ता मुलाचा शोध
प्रतिनिधि . प्रवीण मेश्राम
गदचांदुर येथील ६ वर्षीय रोहित गोछायट हा बालक वडील मारल्या मुळे रागाने २१ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता च्या सुमारास घरून निघून गेल्याचे कळतच परिवाराने पोलीस स्टेनमध्ये घडलेली संपूर्ण कहाणी सांगितली माझा बाळाला शोधून द्या हंबरडा फोडला . गडचांदुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गोपाल भारती आणि त्यांच्या सर्व टीम नी रात्र जागून काढत शोध मोहीम हाती घेतली सकाळी ७वाजता च्या सुमारास रोहित याला शोधून काढले.
पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार गडचांदुर येथील वॉर्ड न ६येथे वास्तव्यास असलेल्या भीमा गोच्यायट वय २७वर्ष यांनी ६ वर्षीय मुलाला वडिलांनी मारल्या मुळे तो रात्रीचे १० वाजता पासून घरून निघून गेला सर्व सर्व परिवाराने त्याची शोध घेतला पण त्याचा कुठेच पता नाही .सर्व परिसर पहाला पण तो मिळाला नाही.साहेब माझ्या मुलाला शोधा असा हंबरडा त्या मुलाच्या आई नी फोडला त्या व्याकूळ आईची अवस्ता पाहून पोलिसांना सुधा राहवलं नाही त्यांनी लगेच शोध मोहीम हाती घेतली व रोहित च्या शोधत आखी रात्र जागून काढली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी आपल्या सूत्राच्या आधारे शोध मोहीम चालू केली संपूर्ण रात्र पोलीसांनी शोध मोहीमेत काढली तपासा दरम्यान सकाळी ७ वाजता मुलगा घरापासून २किमी अंतरावर असणाऱ्या मामाच्या घरात पोलिसांना मिळाला
अवघ्या १०तासात पोलीसांनी शोध लावत आईचा हंबरडा थांबायला .आईच्या हंबरड्याने पोलिसांना ही पाझर फुटला आणि रोहित ला शोधून काढले.