लॉकडाऊन काळातील वीजबिल माफी व शेतकऱयांच्या प्रश्नावर भाजपा चे उद्या निषेध आंदोलन
राजुरा (प्रतिनिधी) : मार्च महिनापासून कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने लॉकडाऊन ची घोषणा केली होती. लॉकडाऊन च्या मार्च ते जुन ह्या तीन महिन्याच्या काळात वीजवितरण तर्फे ग्राहकांना वीजबिलाचे वितरण करण्यात आले नाही. तसेच ह्या दरम्यान सामान्य जनतेची झालेली आर्थिक कोंडी लक्षात घेता राज्य शासनाने ह्या तीन महिन्याच्या काळातील वीजबिलात सूट देण्याची व 100 युनिट पर्यंत वीजबिल माफी देण्याची घोषणा केली होती. परंतु वीजबिलात सूट व माफी देण्याऐवजी ग्राहकांना ह्या तीन महिन्याच्या काळात अवाढव्य बिले पाठविली व सूट व माफी देण्याऐवजी राज्य सरकार ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी दबाव आणत असून ऊर्जामंत्री वारंवार आपल्या घोषणांपासून घुमजाव करून जीवन जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे. तसेंच ह्या वर्षी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचे म्हणजे कापूस सोयाबीन व धान ह्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पिकांवर आलेल्या बोण्ड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या हाती सरासरीच्या 40%च पिक आले आहे ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून ह्या शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या धर्तीवर 50 हजार रुपये मदत द्यावी या मागणी साठी भारतीय जनता पार्टी राजुरा च्या वतीनं उद्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयासमोर माननीय आमदार सुधीर मुनगंटीवार. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर ह्यांच्या मार्गदर्शनात व श्री देवरावजी भोंगळे जिल्हाध्यक्ष भाजपा (ग्रामीण) माजी आमदार ऍड संजय धोटे, माजी आमदार सुदर्शनजी निमकर ह्यांच्या प्रमुख उपसस्थितीत तहसील कार्यालयासमोर राज्यशासनाविरोधात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. ह्या आंदोलनात जनतेनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष व जिप सभापती सुनील उरकुडे, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, जिल्हा सचिव मधुकर नरड, हरिदास झाडे.कार्यकारणी सदस्य अरुण मस्की संजय उपगन्लावर. तालुका सरचिटणीस प्रशांत घरोटे. दिलीप वांढरे. युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन शेंडे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे आदींनी केले आहे.