आम आदमी पार्टीचे ओबीसी मोर्चाला समर्थन!
चंद्रपूर । किरण घाटे
येत्या 26 तारखेला संविधान दिनाचे दिवशी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणा-या भव्य ओबीसी मोर्चाला आम आदमी पार्टी जिल्हा कमेटीने संपूर्ण समर्थन जाहीर केले असून पक्षाची ओळख होईल असे झेंडे, बॅनर किंवा टोपी न लावता सामान्य ओबीसी नागरीक म्हणून या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.
जनगणनेत ओबीसीचा स्वतंत्र कॉलम असावा या प्रमुख मागणीसह ओबीसीच्या अनेक प्रलंबीत मागण्यासाठी ओबीसी समाज सतत आग्रही आहे. मात्र शासन याकडे लक्ष न देता ओबीसीवर सतत अन्याय करीत आहे. याचा आम आदमी पार्टी निषेध करीत आहे.
52 टक्के ओबीसीचा विकास झाला नाही तर देशाचा विकास कसा होईल? असा प्रश्नही आम आदमी पार्टीने उपस्थित केला आहे. आम आदमी पार्टीचे सदस्य, पदाधिकारी, हितचिंतक व कार्यकत्यानी 26 नोव्हेंबरच्या मोर्चात पक्षाची ओळख न दाखविता सहभागी व्हावे असे आवाहन आपचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे यांनी आवाहन एका पत्रकातुन केले आहे.
ओबिसी मोर्चा कार्यालयात निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुनिल देवराव मुसळे, महानगर संयोजक राजेश विराणी, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, मीडीया प्रमुख राजेश चेडगुलवार, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, सचिव महानगर राजु कुडे, कोषाध्यक्ष महानगर सीकंदर सागोरे, शंकर धुमाळे, ऑटो संघटना जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, माजी संयोजक पोटे, संदीप तुर्कयाल झोन 2 चे संयोजक रिजवण खान, पंडित गुरुप्रसाद द्विवेदी, गडे प्रसाद तिवारी, मारुती धकाते, भुवनेश्वर निमगडे, बशीर भाई आदि आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.