बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र : अंकुश नागुलवार
चंद्रपूर : मित्रांनो शिक्षण हा एक मानवी जीवनाचा मुलभूत अंग आहे. म्हणून तो सर्वांच्या अंगी यावा किंवा त्या शिक्षनाला सर्वांना उपभोगता यावा, हे खरे.
पण जेव्हा हा शिक्षण सर्वांनी उपभोगला किंवा याचा आस्वाद घेतला तेव्हाच जीवनाच कल्याण होईल. आणि जे स्वप्न डॉ. आंबेडकरांनी, महात्मा फुलेंनी आणि अशा अनेक थोर नेत्यांनी बघितलं ते उदयास येईल. आणि डॉ. कलाम सरांनी म्हटल्याप्रमाणे एक दिवस आपला भारत देश महासत्ता होईल. पण हे सगळे पाहता शिक्षनाचे दरवाजे शासनाने बंद केले आहे. या बंद दरवाज्याचा असर तुम्हाला पुढील पिढीत बघायला मिळेल जेव्हा ती बेकारी, अशिक्षित आणि गुलामगिरीत दिसेल. या बंद शाळांचा फटका गरीब व होतकरू विद्यार्थ्याना व पालकांना सोसावं लागत आहे. कारण धनवान लोकांकळे तर स्मार्ट फोन, लॅपटॉप , वायफाय या सुविधा आहेत प्रश्न येतो तो गरीब , शेतमजूर, शेतकरी लोकांचा. ठीक आहे आपण कारोणा रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे सर्व केले पण शिक्षण हे आजच्या काळात जीवनावश्यक श्रेणीमध्ये येतो हे ही विसरायला नको. जर शासन सुशासन पद्धतीनं बिहारसारख्या राज्यात निवडणुका लढवू शकतो , दारू, जिम, मंदिरे उघडू शकतो मग शिक्षणाच्या दरवाज्यानां सरकारने पासवर्ड टाकून विसरलेय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण पद्धती उदयास आली. मग हिच्या अंमलबजावणीसाठी शासन कटिबध्द आहे का? सरकारने कधी समाजातील खालच्या थराचा विचारच नाही केला ही शोकांतिका.म्हणजेच एक काळ होता कि, सर्वजण प्राथमीक शिक्षनापासून ते पदवीपर्यंत किंवा त्यापेक्षाही समोरच शिक्षण हे निशुल्क पद्धतीने शिकलेला दिसून येत आहे. पण आज जे आपण पाहत आहोत कि, बालवयापासूनच शिक्षणावर हजारो रुपये खर्च करून शिक्षण विकत घ्याव लागत आहे. म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार करता बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा षडयंत्र चालत आहे व ते आपण समजण्यात असमर्थ ठरत आहोत हे खरे. ज्या वेळेस हे सर्व कळेल तेव्हा खूप वेळ झालेली असेल. हा जो “बहुजन” हा शब्द प्रयोग मी केलेला आहे तो म्हणजे ST, SC, OBC, MINORITIES व सर्व धर्म प्रवर्तित (मूळनिवासी) समाज होय. मी माझ्या “वास्तविक” या पुस्तकात सुद्धा विस्तृत मांडलेले आहे.