बंदर(शिवापूर) कोळसा खदान सुरू करा!
बहुप्रतिक्षित प्रकल्प निकाली काढण्याची मागणी
केंद्र व राज्य सरकारला स्थानिकांचे निवेदन
तालुका प्रतिनिधी
चिमूर.
चिमूर तालुक्यातील बंदर (शिवापूर) येथे बंदर कोल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत कोळसा खदान सुरू करण्याबाबत केंद्रसरकार हालचाली करीत असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी केंद व राज्यसरकारला निवेदन केलं असून बहुप्रतिक्षित प्रकल्प निकाली लावण्याची मागणी केली आहे.
चिमूर तालुक्याच्या बंदर परिसरातील भूभागात मोठ्या प्रमाणावर कोळसा असल्याचे सर्वेक्षणातुन सामोरे आले आहे. या प्रकल्पासाठी चिमूर तालुक्यातील बंदर(शिवापूर),शेंडेगाव,मजरा(बे.) व गदगाव या गावाच्या हद्दीतील ११७०.१६ हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. या बाबत केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने वनजमिनीबाबत उपविभागीयस्तरीय समितीचा अवहाल व संबधित ग्रामसभेचा चालू वर्षाचा ठराव मागितला होता. या ठिकाणी कोळसा खदान सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव १९९९ पासून प्रलंबित आहे. नुकताच केंद्र सरकारने नव्या जाहीर केलेल्या लिलाव यादीमध्ये बंदर चा समावेश होता पण मागील काळात वन्यजीवप्रेमींच्या विरोधाने या प्रस्तावाला वगळण्यात आलं.असाच प्रकार १९९९ व २०१० मध्ये झाला आहे.
या मुळे स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी सामूहिक निवेदन देत शेतीला लागून जंगल असल्याने वन्यप्राणी नुकसानीने होणारे अत्यल्प उत्पन्न व शेती करताना निर्माण होणाऱ्या अडचणी सांगत या प्रकल्पाला मंजुरी देण्याच जाहीर केलं असून तातडीने सरकारे कोळसा खदान सुरू करावी. या कोळसा खदाणी मुळे निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी स्थानिकांना उपलब्ध करून द्यावी आशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देत त्याची प्रतिलिपी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाला ट्विट करण्यात आली आहे.