सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपुर जिल्हाचा विद्यार्थी मेळावा सम्पन्न
चंद्रपूर । काल दिनांक १३/११/२०२० रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे परशुराम भवन, वानखेडे शाळेजवळ, इंदिरानगर, मुलरोड चंद्रपूर येथे विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या विद्यार्थी मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरिता सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्याचे प्रमुख माननीय महेश भारतीय सर प्रामुख्याने उपस्थित होते.
मा. महेश भारतीय सर यांनी मोदी सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसे वंचित व बहुजन समाजाच्या विरोधात आहे. एससी, एसटी, ओबीसी, एनटी यांची स्कॉलरशिप कश्यारितीने रोखण्यात येत आहे.
सरकारी शाळेचे खाजगीकरणाचे धोरण थांबवण्यासाठी उपाय योजना, विनाअनुदानित शाळा कायम स्वरुपी अनुदानित करून शिक्षकांना नोकरीची हमी मिळण्याबाबत, शिक्षक प्राध्यापक नोकरी भरती नियमित व सुरू सुरळीत करण्याबाबत, CBSE शाळेचे 100% वाढीव अवाजवी शुल्क आकारणी धोरण रद्द करण्यासाठी, स्वाधार योजनेच्या लाभासाठी या सर्व मुदयानवर मार्गदर्शन करुन सम्यक विद्यार्थी आन्दोलनाची भूमिका व त्यावर करीत असलेल्या कार्या बद्दल माहिती दिली.
त्यासोबतच वंचित बहुजन आघाडी कडून नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकी मध्ये इंजि. राहुल वानखेडे यांना जिंकवून आणा असे आवाहन सुद्धा चंद्रपुरतील पदवीधर मतदाराना केले.
सदरहु विद्यार्थी मेळाव्याला चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन येथील प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी यांनी उपस्थिती दर्शवत भविष्यात आम्ही सम्यक विद्यार्थी आंदोलनं च्या सोबत राहू आणि त्यांच्या सोबत काम करू अशी इच्छा सुद्धा जाहीर केली. त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी चंद्रपूर येथील सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच योग्य आहे असा विश्वास सुद्धा मा. कुशलभाऊ मेश्राम आणि राजूभाऊ झोडे यांनी आपल्या भाषणात ठणकावून सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा. धिरज तेलंग हे होते. कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन सम्यक चे चंद्रपूर महासचिव किनाराताई खोब्रागडे, कार्यक्रमाचे छान आभार प्रदर्शन सम्यक चे जिल्हा उपाध्यक्ष अभिप्रिताताई गजभिये यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर टीम नी केले.
त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य महासचिव मा. कुशल भाऊ मेश्राम, विदर्भ चे सदस्य राजूभाऊ झोडे आणि चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मा. डॉ. प्रवीण गावतुरे सर, चंद्रपूर शहर अध्यक्ष मा. बंडू भाऊ ठेंगरे, वंचित बहुजन महिला आघाडीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्षा मा. कविताताई गौरकार, भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष मा. इंजि. नेताजी भरणे सर, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र राज्य सचिव मा. रोहितदादा भगत, नागपूर जिल्हाध्यक्ष मा. संजोकदादा ढोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन चे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सदस्य मोठया प्रमाणात उपस्थित होते.