चंद्रपूर जिल्ह्यात  २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा : खासदार बाळू धानोरकर 

0
535

चंद्रपूर जिल्ह्यात  २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा : खासदार बाळू धानोरकर 

चंद्रपूर : जिल्हा हा  ऊर्जानिमिर्ती करणारा जिल्हा आहे. खासगी व शासकीय वीजनिर्मिती केंद्राच्या माध्यमातून ४४२० M. W वीजनिर्मिती होते. या जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रदूषण सहन करीत असतात. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात  २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना केली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. जिल्ह्यांत कृषी पंपांना नियमित वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल आहेत. १ एप्रिल २०१८ पासून जिल्ह्यात कृषिपंप जोडणी च्या मागण्या प्रलंबित आहेत. ज्यांना कनेक्शन दिलेत त्यांना  अखंडित वीजपुरवठा होत नाही.भारनियमना ऐवजी म. रा. वि. वि. कंपनीने सिगंल फेस व  थ्री फेस वीजपुरवठ्याचे जिल्ह्यात वेळापत्रक घोषित केले आहे. परंतु २४ तास  थ्री फेस पुरवठा दिल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल.
महाजनको कडून ग्रीड मार्फत संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार  थ्री फेस वीजपुरवठा मिळालाच पाहिजे हि आपली आग्रही  भूमिका असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपण रस्त्यावर उतरू असा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे.
 वीजपुरवठा १ फेस असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागते. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात असल्यामुळे वीजपुरवठा १ फेस असल्यामुळे इतर उपकरणे चालत नाही. पाणी टाकी वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे भरली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी पुरवठा देखील अनेकदा सुरळीत सुरु नसतो. असे अनेक प्रश्न उद्भवत असतात. या समस्या तात्काळ निकाली काढण्याकरिता चंद्रपूर जिल्हात २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here