कटाक्ष: जग पुन्हा डाव्या मध्यममार्गाकडे:जयंत माईणकर
(9821917163)
सत्तेचा नवीन प्रवाह –
उजवीकडून डावी कडे
थिल्लरपणा कडून गांभीर्या कडे
खोटेपणा कडून सच्चेपणा कडे
वरील चार ओळीत अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचा विजय आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं पराभव या दोन्ही गोष्टी सामावलेल्या आहेत. तर उपाध्यक्ष पदी आफ्रिकन-भारतीय-अमेरिकन असलेल्या कमला हॅरीस निवडून आल्या आहेत. सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशी ही गोष्ट.
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात विज्ञानाच्या साह्याने मानव चंद्र आणि मंगळावर झेप घेण्याची तयारी करत असतानाच जगाच्या पाठीवरील अनेक देशात आमचा देश केवळ आमच्याच लोकांसाठी अशी sons of soil ची थिअरी मांडणारे लोक जगातील महत्त्वाच्या देशात सत्तेवर आले. रशियात बोरिस येल्त्सिन या सर्वसमावेशक नेत्यानंतर व्लादिमीर पुतीन यांचा उदय इंग्लंडमध्ये वांशिक युरोपियन लोकांच स्वागत करणाऱ्या आणि आशियाई लोकांविषयी दुजाभाव ठेवणाऱ्या डेव्हिड कॅमेरून, युरोपियन युनियन मधून बाहेर पडणाऱ्या थेरेसा मे आणि आता बोरिस जॉन्सन सत्तेवर आले. जर्मनीत अँजेला मौर्केल तर जपान मध्ये शिंझो आबे आणि भारतात नरेंद्र मोदी अशा उजव्या विचारसरणीच्या नेत्यांची मांदियाळी झाली. या सर्वांवर कडी केली ती म्हणजे अनपेक्षितरित्या अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची २०१६ साली झालेली निवड.जगातील एकमेव महासत्तेवर अमेरिकेत प्रवेश करतानाचे व्हिसाचे नियम अधिक कडक करणाऱ्या, मेक्सिकन, भारतीय लोकांच्या एच1बी व्हिसा यासाठी विचित्र नियमावली करत त्यांच्या प्रवेशावर निर्बंध आणणाऱ्या नेत्याचा उदय ही एक चिंतेची बाब होती. पण सुज्ञ अमेरिकेन जनतेला ट्रम्पमधील फोलपणा लगेच कळला आणि चार वर्षात त्यांनी आपली चूक नुसती सुधारलीच नाही भारतीय वंशाची महिला उपाध्यक्ष करून नुकसानभरपाई सुद्धा करुन दिली. अमेरिकेन जनातेप्रमाणे भारतीय मतदार २०२४ला सुज्ञ व्हावा ही अपेक्षा. उजवी विचारसरणी म्हणजे आपला देश केवळ आपल्या धर्माच्या, भाषेच्या किंवा वंशाच्या अथवा रंगाच्या बहुसंख्य लोकांसाठी आहे आणि इतर लोक या बहुसंख्यांक लोकांचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्यांच्यावर निर्बंध घालण्याची विचारसरणी. या विचारसरणीची सुरुवात हिटलरने जर्मनीत ज्यू विरोधात केली.भारतातील भाजपसह संघ परिवार याच विचारसरणीवर आधारित आहे. भारतात ज्यु ऐवजी मुस्लिम विरोध एवढाच काय तो फरक. शिवसेनेची सुरुवातही याच प्रकारच्या मुंबई मराठी माणसांची या मुद्द्यावर झाली होती. अर्थात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती करून सेनेने सर्वसमावेशकता दाखवली आहे.
महासत्तेच्या उपाध्यक्ष पदी भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची झालेली निवड या घटनेवरून परकीय असल्याच्या मुद्द्यावरून सोनिया गांधींना पंतप्रधान बनण्यास विरोध करणाऱ्या पक्षांनी आणि व्यक्तींनी धडा घ्यावा. अमेरिकेच्या इतिहासात महिला उपाध्यक्षपदी निवडून येण्याची ही पहिली वेळ.कदाचित २०२४ ला याच कमला हॅरीस डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार असतील. त्यावेळी तमाम भारतीय लोकांची मान जगात उंचावेल. पण त्यावेळी सोनिया गांधींना मुळ इटालियन असल्याने पंतप्रधान बनण्यास विरोध करणारे किंवा आजही त्यांच्या परकीय मूळ या मुद्द्यावर खिल्ली उडविणारे काय उत्तर देतील हा खरा प्रश्न आहे.
कमला हॅरीस यांच्या आई या भारतीय वंशाच्या डॉक्टर होत्या. तर, वडील डोनाल्ड जमैकामधील अर्थतज्ञ होते. जो बायडन यांनी हॅरीस यांना ‘रनिंग मेट’ म्हणून निवडल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. तर, आशियाई-आफ्रिकन मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा रंगली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील हॅरीस यांच्यावर प्रचार सभांमधून अनेकदा टीका केली होती. मात्र, अमेरिकन नागरिकांनी डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडन आणि कमला हॅरीस यांच्या पारड्यात भरभरून मतदान केले.
१९६४ मध्ये जन्म झालेल्या कमला हॅरीस यांनी आपला लहानपणीचा बराच काळ हा आजोबांसोबत (आईचे वडील) घालवला. आजोबा पी. व्ही. गोपालन झांबिया येथे राहणारे होते. गोपालन हे भारत सरकारचे अधिकारी होते. त्यांना झिम्बाब्वेच्या शरणार्थींच्या नोंदी आणि इतर कामासाठी पाठवण्यात आल . त्यावेळी झिम्बाब्वे नुकताच ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता. माझे आजोबा हे माझ्या आवडीच्या लोकांपैकी एक असल्याचे कमला हॅरीस यांनी याआधीही सांगितले आहे.
कमला हॅरीस यांची आई श्यामला गोपालन यांनी आपल्या मुलांची नाळ भारतासोबत जुळलेली असावी यासाठी प्रयत्न केले. तामिळ वंशाच्या भारतीय-अमेरिकन श्यामला या नावाजलेल्या कॅन्सर संशोधक आणि सक्रिय कार्यकर्त्या होत्या. त्यांनी आपल्या मुलींचे नामकरण संस्कृतमधीन केले. कमला हॅरीस यांच्यावर त्यांच्या आईचा मोठा प्रभाव आहे. स्थलांतर, समान अधिकाराच्या मुद्यावर कमला हॅरीस यांची मते ही त्यांच्या आईसारखीच आहे. श्यामला गोपालन यांचे पदवी शिक्षण दिल्लीतून झाले. श्यामला ह्या फक्त संशोधकच नव्हे तर मानवाधिकार कार्यकर्त्या म्हणूनही सक्रिय होत्या. तर कमला हरीश यांनी हार्वर्ड विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला.
बायडन यांना डेमोक्रॅटीक पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी कमला हॅरीस यांची उपराष्ट्रपतीपदासाठी निवड केली. त्यावेळी जो बायडन यांनी कमला हॅरीस यांना बहाद्दूर योद्धा म्हटले होते.
कमला हॅरीस या कॅलिफोर्नियाच्या अटर्नी जनरल म्हणून काम करत असताना त्यांची कामाची पद्धत पाहिली आहे. त्यांनी अनेक मोठ्या बँकांना आव्हान दिले होते. काम करणाऱ्या लोकांची त्यांनी मदत केली आहे. महिला व बालकांना शोषणापासून त्यांनी वाचवले आहे. मला त्यावेळीदेखील मला त्यांचा अभिमान वाटत होता आणि आताही अभिमान वाटत असल्याची भावना बायडन यांनी व्यक्त केली होती.
२०१६ मध्ये त्यांनी रिपब्लिकन सिनेटर लोरेटा सानशेज यांचा पराभव करत अमेरिकन सिनेटमध्ये कनिष्ठ प्रतिनिधी म्हणून निवडून आल्या. अमेरिकन काँग्रेसच्या अप्पर चेंबरपर्यंत निवड होणाऱ्या हॅरीस या दुसऱ्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई-अमेरिकन महिला होत्या आज* *महासत्तेच्या दुसऱ्या स्थानी पोचल्याचा आनंद आहेच.तो आनंद २०२४ला मोदींचा पराभव होऊन द्विगुणित *व्हावा हीच अपेक्षा!
तूर्तास इतकेच!